कॅनॉल अस्तरीकरणातील कामांमध्ये अनियमतता ?

दौड तालुक्यातील पाटस गावातील कनॉल अस्तरीकरणाला टप्या टप्याने सुरवात करण्यात आली आहे . निधी हा एकदाच येतो तो वारंवार टाकला जात नाही यासाठी काम उत्कृष्ट दर्जाचे व्हावे अशी अपेक्षा आहे . मात्र वास्तविक तसे नाही रोलींग करताना पाणी नाही वापरले, जाडी कमी, कागद तुटलेल्या अवस्थेत आहेत . असे काम पाहता पाटसकरांना बारामतीतील कामांची आठवण येते स्वच्छ काम, नियमित पाहणी आणि टिकाऊ दर्जेदार काम पाहवयास भेटते पण इथे तस दिसत नाही. इरिकेशन अधिकाचऱ्यांची बघ्यांची भूमिका आहे असे गावचे सामाजिक कार्यकर्ते पोपटराव भागवत यांनी म्हटले आहे . पाटस मधील अंबिकानगर तळ्यातील पाणी पुरवठा योजना आहे विहीरी आहेत ज्यांना जमिनी नाहीत गुरे, ढोरे संभाळून जीवन जगतात अशा नागरिकांच्या समस्या उन्हाळ्यात निर्माण होतील यांची समस्या दूर करण्यासाठी शासनाने तळ्यांवरती आऊटलेट टाकावी अशी मागणी पत्राद्वारे सोमवारी ता.03-10-2022 रोजी सकाळी 10 वाजता पाटस येथील कडा वसाहत वरती करणार असून मागणी पूर्ण न केल्यास कामांस विरोध केला जाईल असेही निवेदन देण्यात येईल असे भागवत यांनी सांगितले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here