इंदापूर (उपसंपादक:संतोष तावरे): महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या खरीप हंगाम सन २०२१-२०२२ मधील पीक स्पर्धा विजेते शेतकरी यांचा सन्मान माननीय माजी राज्यमंत्री श्री. दत्तात्रय भरणे मामा यांचे हस्ते दिनांक ०१मे २०२३ रोजी लोकनेते शंकराव पाटील सभागृह इंदापूर येथे करण्यात आला. मौजे अवसरी येथील प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी श्री. बाबुराव निवृत्ती शिंदे यांचा मका पिकामध्ये जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक आला असून श्री. अरुण दत्तात्रय शिंदे यांचा मका पिकामध्ये तालुकास्तरावर तृतीय क्रमांक आला आहे. आधुनिक पीक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान ,ठिबक सिंचन व विद्राव्य खतांचा वापर ,एकात्मिक कीड व रोग नियंत्रण यामुळे उत्पादन खर्च कमी झाला व उत्पादन वाढल्याचे श्री. बाबुराव शिंदे यांनी जनता एक्सप्रेस मराठी न्यूजशी बोलताना सांगितले. पुढे ते म्हणाले की , कृषी सहायक अनुपमा देवकर ,कृषि पर्यवेक्षक श्री.कल्याण पांढरे व मंडळ कृषी अधिकारी श्री गणेश सूर्यवंशी यांचे आपणास वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले तसेच आपल्या श्रमांची योग्य दखल कृषी विभागाने घेतल्याने आपणास अधिकाधीक उत्पन्न घेण्यासाठी प्रेरणा मिळाली असे श्री.शिंदे यांनी सांगितले.
Home Uncategorized कृषी विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या पिक स्पर्धामध्ये अवसरीचे बाबुराव निवृत्ती शिंदे व...