पुणे: ग्रामीण कृषि जागरूकता आणि
कृषि औद्योगिक कार्यक्रमांतर्गत कृषि महाविद्यालयातील कृषिदूत आळंदी म्हातोबा (ता. हवेली) येथे शेतकर्यांच्या विविध समस्या जाणून घेत आहेत. त्याचबरोबर त्यांना माती परिक्षण, सेंद्रिय शेती इ. महत्व पटवून देत आहेत.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा प्रसार करत आहेत. या कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस. डी. मासाळकर, कार्यक्रम समन्वयक डॉ.व्ही.जे.तरडे, कार्यानुभव कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.पी.पी. खराडे, कार्यक्रम अधिकारी डॉ. जे.एस. कुंभार आणि कृषि महाविद्यालयातील विविध तज्ञांचे मार्गदर्शन लाभत आहे. कृषी महाविद्यालयातील अंतिम सत्राचे विद्यार्थी सुदर्शन लाटे, प्रणव पिसे, राज पानसरे, सिद्धेश काटोरे, रितेश पाटील, सागर मरडे, तुषार बोराटे, विराज पाटील, प्रथमेश पवार सक्रियपणे प्रात्यक्षिक कार्यक्रम राबवत आहेत.