नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेना महाराज यांची पुण्यतिथी नाभिक समाज कुर्डूवाडी शहरच्या वतीने भोरे वस्ती येथील नागन्नाथ महाराज मंदीर व संत सेना महाराज मंदिर येथे आयोजित करण्यात आली होती.
या कार्यक्रमाची सुरुवात नागन्नाथ महाराज यांचा अभिषेक संजय महाराज गाडेकर यांचे शुभहस्ते करण्यात आला.
सकाळी दहा वाजता ह.भ.प सागर महाराज कुर्डुकर यांचे प्रबोधपर किर्तन झाले.या वेळी भजनी मंडळाचा मंत्रमुग्ध भजनाने संत सेना महाराज यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर श्री संत सेना महाराज यांचे जीवनपट सांगुन प्रतिमेवर फुले टाकण्यात आली.
नंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी पंचायत समितीचे अधिकारी महेश शेंडे,कर्मविर चव्हाण,मा.नगरसेवक किसन हानवते,भाजपा शहरअध्यक्ष शंकर बागल,युवा नेते अर्शद मुलाणी,बापु भोरे,रणधीर तात्या शिंदे,जंवजाळ,मोरे महाराज,कांबळे साहेब,अतुल राऊत यांचे सह प्रमुख मान्यवर ऊपस्थीत होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुधिर भाऊ गाडेकर,रामभाऊ राऊत,पोपट गाडेकर,संजय महाराज गाडेकर,गणेश नाना गाडेकर,अजय काशिद,प्रकाश अवचर,सुधिर काशीद,संजय काशीद,वैजिनाथ राऊत,विनोद गायकवाड,राजु सावंत,बंडु चौधरी,अनिल ठोंबरे,वसंत वाघमारे,गणेश भालेकर,विजय मेंबर गाडेकर,अविनाश कोकाटे,नवनाथ हवलदार,नागजी ताटे,रवी राऊत,बालाजी राऊत,माऊली दळवी,अशोक गाडेकर,प्रदीप साळुंखे,बाळासाहेब म्हेञे,निलेश खांडेकर,रमेश साळुंखे,महादेव गाडेकर,बाबुराव सुर्यवंशी,दत्ता मामा राऊत,बालाजी गाडेकर,ईश्वर गाडेकर,बापु वाघमारे,अदित्य सुर्यवंशी,यांचे सह कुर्डुवाडी शहरातील नाभिक समाजबांधवांनी मोठ्या परीश्रम घेतले. यावेळी नाभिक समाजातील नाभिक बांधव,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.