कुर्डूवाडी (प्रतिनिधी:नसीर बागवान)-कुर्डूवाडी येथील रेल्वे कॉलनी पंचशील नगर व परिसरात नळाला पाणी येत नाही आले तर घाण पाणी येते याबाबत नगरपालिका दखल घेत नसल्याने परिसरातील महिलांनी मुख्याधिकारी राठोड यांना घेराव घालून जाब विचारला.
रेल्वे कॉलनी भागातील सुसलादे यांच्या घराच्या पाठीमागील पंचशील नगर येथे घराच्या नळाला पाणी येत नाही शेजारील भागात काही नळांना पाणी येते पण ते पाणी घाण असते अत्यंत कमी दाबाने व कमी पाणी येते सतत पाठपुरावा करून देखील दखल घेतली जात नाही त्यामुळे संतप्त महिलांनी सकाळी साडेअकरा वाजता नगरपालिकेत जाऊन ठाण मांडले.
मुख्याधिकारी आले नसल्याने महिलांनी पाणीपुरवठ्याचे अतुल शिंदे यांच्याकडे मोर्चा वळवला आमच्या भागात पाणी का येत नाही आले तर अत्यंत कमी दाबाने येते व घाण पाणी येते असा जाब विचारला परंतु अतुल शिंदे यांनी चुप्पी साधून फक्त ऐकण्याचे काम केले.अतुल शिंदे यांनी महिलांना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु तो निष्फळ ठरला पालिका मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड कार्यालयात आले असे समजताच सर्व महिला राठोड यांच्या कार्यालयात गेल्या व पुन्हा जाब विचारू लागल्या मुख्याधिकारी सर्व समस्या जाणून घेतल्या व पाणीपुरवठा विभागाचे अतुल शिंदे यांना सर्व समस्या सोडवण्याचे आदेश दिले सर्व महिलांनी पाण्याच्या समस्या लवकर न सुटल्यास नगरपालिके समोर आंदोलन करण्याचा इशारा मुख्याधिकार्यांना दिला यावेळी अलका लोंढे अनिता नाईकनवरे अरुणा नाईकनवरे शोभा वाघमारे मनीषा परदेशी मुमताज खान फर्जाना खान यासह पंचशील परिसरातील अनेक महिला उपस्थित होत्या.