कुरेशी बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव मी कटिबद्ध- माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे.

इंदापूर:ऑल इंडिया जमेतुल कुरेश या इंदापूर शहर कुरेशी जमात सदर (अध्यक्ष) पदी शाबीर अब्दुल मजीद बेपारी यांची निवड व इंदापूर शहर कुरेशी जमात नाईक सदर (उपाध्यक्ष) पदी निवड झालेबद्दल यांचा समाज बांधवांच्या उपस्थितीत इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी सत्कार केला. कुरेशी बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव मी कटिबद्ध असल्याचे माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर ,इंदापूर शहर अध्यक्ष बाळासाहेब ढवळे नगरसेवक पोपट शिंदे,तसेच इंदापूर शहरातील पदाधिकारी उपस्थित होते
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here