किरीट सोमय्यांना पोलिसांनी कराडमध्ये रोखले, राजकीय वातावरण तापले.सोमय्या घेणार सकाळी 9.30 वाजता पत्रकार परिषद.

किरीट सोमय्यांना पोलिसांनी कराडमध्ये रोखले, सकाळी 9.30 वाजता पत्रकार परिषद

मुंबईहून कोल्हापूरला निघालेले भाजप नेते किरीट सोमय्या हे कराडमध्ये थांबले आहेत. कोल्हापूर येथे पोहोचल्यावर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं पोलिसांनी सांगितल्यानंतर ते कराड येथे थांबले आहेत.
सध्या किरीट सोमय्या हे कराड येथील विश्रामगृहावर थांबले आहेत. आज सकाळी 9.30 वाजता (20 सप्टेंबर) ते पत्रकार परिषद घेणार आहे. कोल्हापूरमध्ये हसन मुश्रीफ यांचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीतर्फे निदर्शनं होणार होती ती आज रद्द झाली.

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या अटकेची शक्‍यता आणि कोल्हापूर दौरा यांनी राजकीय वर्तुळात राळ उडवून दिली आहे. रविवारी झालेल्या नाट्यमय घडामोडींनंतर सोमय्या रात्री महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरसाठी रवाना झाले मात्र करवीरनगरीत जाण्यापासून त्यांना पोलिसांनी रोखलं होतं.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनहून सुटणाऱ्या महालक्ष्मी एक्सप्रेसने सोमय्या रवाना होताना पोलिसांनी त्यांना अडवलं. तुम्ही मला अडवू शकत नाहीत, माझ्यावरील कारवाई बेकायदेशीर आहे असं म्हणत कोल्हापूरला आपण जाणारचं असं त्यांनी सांगितलं.यानंतर बराचवेळ सोमय्या हे पोलिसांचा गराड्यातच अडकले होते. मात्र, तुम्ही मला कोल्हापूरच्या वेशीवर अडवू शकता, इथे मुंबईत नाही, असं म्हणत सोमय्या रेल्वेत बसले व कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले.

“मुख्यमंत्र्यांच्या आदेशाशिवाय हे होऊ शकत नाही, मुख्यमंत्री व शरद पवार यांचं हे कारस्थान आहे. मात्र,हसन मुश्रीफांचा घोटाळा मी उघड करणारच. चार तास मला घरात कोंडून ठेवलं याचं उत्तर मुख्यमंत्री व गृहमंत्री देणार का?,’ असा सवाल सोमय्या यांनी केला.

“कोल्हापुरात जाताच प्रथम मी अंबामातेचे दर्शन घेणार,असं सोमय्या यांनी सांगितलं होतं. मला देण्यात आलेली नोटीस पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचंही त्यांनी सांगितलं. पोलिस हे मंत्री हसन मुश्रीफ यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत,असं सोमय्या म्हणाले.
राजकीय वातावरण तापलं

किरीट सोमय्या यांनी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधातील कागदपत्रे बुधवारी नवी दिल्लीत प्राप्तिकर विभाग आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या उच्चपदस्थांकडे सोपवली होती. विदर्भातील एका मंत्र्याचा गैरव्यवहार बाहेर काढणार असल्याचंही सोमय्या यांनी सांगितलं होतं.
या प्रकरणावर भाष्य करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, “किरीट सोमय्या यांना स्थानबद्ध करण्याची कारवाई पूर्णपणे बेकायदेशीर आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. राज्य सरकारविरुद्ध आमचा संघर्ष सुरूच राहील.”असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.



आज सकाळी ठीक 9 वाजता पहा इंदापूर तालुक्यात घडलेल्या “चिंकारा शिकार प्रकरणाचा सविस्तर आढावा” फक्त ‘जनता एक्सप्रेस मराठी न्यूज’ या चॅनेलवर त्यासाठी आजच खालील लिंकद्वारे चॅनला सबस्क्राईब करा.👇👇

https://youtube.com/channel/UCe6MAYmBoaXevmX77q94ulw



 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here