काष्टी (गणेशा) येथे संत महाराज यांची पुण्यतिथी साजरी
श्रीगोंदा (प्रतिनिधी-रोहन रंधवे)
श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी (गणेशा) येथे श्री. संत सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे बारा बलुतेदार महासंघा चे प्रदेश संपर्क प्रमुख तसेच महाराष्ट्र राज्य धोबी परीट समाज महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डी डी सोनटक्के आणि बारा बलुतेदार महासंघ, महाराष्ट्र राज्य चे अकोला जिल्हाध्यक्ष तसेच धोबी महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष अनिल शिंदे यांच्या हस्ते संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी बोलताना डी डी सोनटक्के म्हणाले की, समाजासाठी एक ज्वलंत दिप तेवत ठेवणारे एक थोर समाजसुधारक संत श्री सेना महाराज यांचे नाव ऐकल्यावर आजही समाजाच्या परिवर्तनासाठी पोटात कालवाकालव होते. उभं आयुष्य समाजासाठी अर्पण करून त्यांच्या अभंगवाणीतून समाजात परिवर्तनाची ज्योत निर्माण केली होती.
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य धोबी महासंघ सर्व भाषिक चे प्रदेश उपाध्यक्ष भैय्याजी रोहनकर, प्रदेश संघटक रविंद्र क्षीरसागर, महाराष्ट्र नाभिक महामंडळ चे अहमदनगर जिल्हा युवा अध्यक्ष अजय रंधवे, धोबी समाज संघटना तसेच बारा बलुतेदार महासंघ, महाराष्ट्र राज्य चे पुणे जिल्हा महासचिव संदिप आढाव, धोबी महासंघाचे अहमदनगर जिल्हा युवा अध्यक्ष गणेश कदम, नाभिक महामंडळाचे श्रीगोंदा तालुका अध्यक्ष विजय क्षिरसागर, काष्टी नाभिक समाज संघटनेचे मल्हारी रंधवे, काष्टी येथील सामाजिक कार्यकर्ते धनंजय लोखंडे, बारीकराव रंधवे इत्यादी उपस्थित होते.