काठमांडू या ठिकाणी झालेल्या नेपाळ भारत हिंदी शिक्षक व साहित्यकार संमेलनात डॉ. शितल मनोजकुमार माने – पवार यांना साहित्यिक अभ्यासामुळे आणि भाषा अभ्यासामुळे जागतिक दर्जाच्या हिंदी भाषा विकास, संवर्धन, संशोधनाच्या आंतरराष्ट्रीय कार्यात दिलेल्या योगदानाबद्दल आंतरराष्ट्रीय हिंदी भाषा भूषण पुरस्काराने डॉ.सौ मंचला कुमारी झा (केंद्रीय हिंदी विश्वविद्यालय हिंदी विभाग,काठमांडू), राजेंद्र कुमार (संशोधन केंद्र डी आर डी चे वैज्ञानिक)यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी सौ. आसावरी बापट ( निदेशक भारतीय दूतावास) ओम प्रकाश (बाल ) डॉ. तुलसी दिवस (टोकियो ) प्रभाकर ढगे ( साहित्यिक तथा संपादक), संयोजक प्रमुख कैलास जाधव, केंद्रीय समन्वयक उस्मान मुलाणी, नेपाल व भारतीय हिंदी साहित्यकार,विविध विश्व विद्यालयातील आलेख वाचक, सर्व हिंदी प्रेमी अध्यापक उपस्थित होते. इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन पाटील साहेब, उपाध्यक्षा मा. पद्माताई भोसले, तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे व सर्व सहकाऱ्यांनी डॉ. शितल माने- पवार चे अभिनंदन केले.
Home Uncategorized काठमांडू येथे कला,विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या डॉ.शितल माने यांना आंतरराष्ट्रीय हिंदी भाषा...