👉 माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून कर्मयोगींच्या स्मृतींना अभिवादन…..
काँग्रेस विचारसरणीचे ज्येष्ठ मार्गदर्शक कर्मयोगी शंकरराव पाटील यांच्या सोळाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी श्रद्धांजली अर्पित करून कर्मयोगींच्या स्मृतींना उजाळा दिला.यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, काँग्रेसी विचारांचा वारसा अखेरच्या श्वासापर्यंत टिकवण्याचे प्रामाणिकपणे काम आदरणीय शंकरराव भाऊंनी केले,सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन त्यांच्यामध्ये समता,बंधुभाव व प्रेम रुजवत असताना या तालुक्यामध्ये धर्मांध शक्तींना तसेच जातीयवादी पक्षांना त्यांनी कधीही पाय रोवु दिले नाहीत.
त्याचबरोबर तालुक्यामध्ये सहकार चळवळ रुजवण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा होता. सहकाराच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या जीवनामध्ये आर्थिक सुबकता आणण्याचे मोलाचे काम कर्मयोगी भाऊंनी केले आहे. हे करत असताना सहकारी संस्थांमध्ये कोणतेही राजकारण न आणता सर्वांना सोबत घेऊन मोठ्या कष्टाने सहकारी संस्था यशस्वीपणे उभा करण्यामध्ये त्यांचा मोलाचा हात होता.त्यांचे एकूणच राजकारण हे सहकार,शैक्षणिक,औद्योगिक केंद्रीत होते अशा एक ना अनेक घटना सांगत श्री.भरणे यांनी कर्मयोगींना अभिवादन केले.
Home Uncategorized काँग्रेसी विचारांचा वारसा अखेरच्या श्वासापर्यंत टिकवण्याचं काम भाऊंनी केले- माजी राज्यमंत्री दत्तामामा...