“कर्मयोगी शंकररावजी पाटील व राजेंद्रकुमार घोलपसाहेब यांच्या दूरदृष्टीमुळे इंदापूर तालुक्याचा विकास”- मा.मंत्री हर्षवर्धन पाटील

कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता गोरगरीब जनतेची सेवा केली : हर्षवर्धन पाटील.
इंदापूर :राज्याच्या सर्वांगीण विकासामध्ये ग्रामपंचायतींचे मोठे योगदान आहे. त्यामुळे महाराष्ट्र हे प्रगत राज्य म्हणून ओळखले जात आहे. आगामी काळातही ग्रामपंचायतींनी गावच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका सक्षमपणे पार पाडावी, असे आवाहन भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी (दि.14) केले.उद्धट येथे ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन व विकास कामांचा शुभारंभ हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. तसेच यावेळी हर्षवर्धन पाटील, अविनाश घोलप यांनी दत्त मंदिर सभामंडपाची पाहणी केली. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप होते. सदर कार्यक्रमामध्ये हर्षवर्धन पाटील बोलत होते.हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता गोरगरीब जनतेची सेवा केली. सर्वसामान्य माणूस हा विकासाचा केंद्रबिंदू म्हणून ग्रामपंचायतींनी केंद्र व राज्य सरकारच्या विकासाच्या योजना कार्यक्षमतेने राबव्यात. उद्धट ग्रामपंचायतीच्या इमारतीमुळे गावच्या वैभवामध्ये भर पडली आहे.कर्मयोगी शंकररावजी पाटील व राजेंद्रकुमार घोलपसाहेब यांच्या दूरदृष्टीमुळे इंदापूर तालुक्यात आज झालेला विकास दिसत आहे. त्यांनी घालून दिलेल्या शिकवणीनुसार आपण सर्व कार्यकर्ते राजकारण, समाजकारण करीत असल्याचे यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले. प्रास्ताविक सरपंच रवी यादव यांनी केले. याप्रसंगी अविनाश घोलप यांचे भाषण झाले. यावेळी निरा भिमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, करणसिंह घोलप, बापूराव यादव, लालासो सपकळ, विजय पांढरे, सत्यशिल पाटील, प्रल्हाद पोळ, उपसरपंच संतोष थोरात, सिद्धेश्वर जाधव, चंद्रकांत भोसले, शहीद मुलाणी, संभाजी अस्वरे, संजय घोलप, मधुकर खरात, संजय थोरात, अमोल थोरात, संतोष काळे, सचिन निकम, महादेव भोसले राजेंद्र भोसले, ग्रामसेवक अरुण जाधव, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन कालिदास आव्हाड तर आभार संतोष चव्हाण यांनी मानले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here