सध्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटला आहे.कोल्हापुरातही याच्या हालचाली दिसू लागल्या आहेत. काही लोक याचा फायदा घेऊन समाजात तेढ निर्माण करू शकतील याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहे.त्यामुळे पाच पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी असणार आहे. तसेच मिरवणुका तसेच सभांना देखील बंदी असणार आहे, असे आदेश अप्पर जिल्हा दंडाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी दिले आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरात जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आली आहे. त्यामुळे पाच पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी आहे. 9 डिसेंबर पासून 23 डिसेंबर पर्यंत आदेश लागू असणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न सुरू असणारे आंदोलन तसेच ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आदेश काढला आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोट कलम (1)अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.