कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. आज शनिवारी (१३ मे रोजी) हा निकाल जाहीर होत आहे.मतदानानंतर समोर आलेल्या बहुतांश एक्झिट पोलमध्ये काँग्रेस बहुमतात अथवा त्याच्या जवळपास दिसत आहे. मात्र आता पुन्हा एकदा निकालात एक्झिट पोलचे आकडे बदलले आहेत. एबीपी न्यूज आणि सी व्होटरच्या एक्झिट पोलने त्यांची अंतिम आकडेवारी अपडेट केली आहे. यापूर्वी यात काँग्रेसला 100 ते 112 जागा देण्यात आल्या होत्या, त्या आता 120 ते 140 करण्यात आल्या आहेत. अर्थात, कर्नाटकात काँग्रेसचे सरकार येण्याची शक्यता आहे. याशिवाय, भाजपच्या जागा 59 ते 79 च्या दरम्यान कमी कण्यात आल्या आहेत. जेडीएसला 16 ते 26 जागा मिळू शकतात. तसेच, दोन ते सहा जागा इतरांच्या खात्यातही जाऊ शकतात.
👉कुठल्या जातीची मते कुणाला? –
सी व्होटरच्या सर्व्हेमध्ये, कुठल्या जातीच्या लोकांनी कुणाला मतं दिले? असा प्रश्न लोकांना विचारण्यात आला. यात लिंगायत समाजाची 56% मते भाजपला, 26 टक्के काँग्रेसला, 12 टक्के जेडीएसला आणि सहा टक्के इतरांना जाताना दिसत आहे. वोक्कालिगा समाजासंदर्भात बोलायचे झाल्यास, काँग्रेसला 32 टक्के, भाजपला 28 टक्के, जेडीएसला सर्वाधिक 35 टक्के आणि इतरांना पाच टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.
याशिवाय, मुस्लीम समाजाची एकगठ्ठा मते काँग्रेसच्या बाजूने जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसला 75 टक्के, जेडीएसला 11 टक्के, भाजपला आठ टक्के आणि इतरांना सहा टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.
👉ओबीसी मते –
याच बरोबर, ओबीसींचे भाजपला ४५ टक्के, काँग्रेसला ३५ टक्के, जेडीएसला १४ टक्के आणि इतरांना ६ टक्के मते मिळू शकतात. तसेच, एससी मतांसंदर्भात बोलायचे झाल्यास, काँग्रेसला ५८ टक्के, भाजपला २५ टक्के, जेडीएसला १३ टक्के आणि इतरांना ४ टक्के मते मिळू शकतात. महत्वाचे म्हणजे, आदिवासी मतांच्या बाबतीतही काँग्रेस पुढे दिसत आहे. या समाजाची 46 टक्के मते काँग्रेस, 35 टक्के भाजपा,13 टक्के जेडीएस आणि सहा टक्के इतरांना मिळू शकतात.
Home Uncategorized कर्नाटक निवडणुक संदर्भात एक्झिट पोलने आपली आकडेवारी बदलली.. कसा असेल निकाल वाचा...