कर्तुत्व नसणाऱ्यांनी ज्येष्ठ व्यक्तीवर बोलताना भान सांभाळावे अन्यथा जशास तसे उत्तर देऊ- ॲड. मंगेश लोंढे
इंदापूर: भाजपचे प्रवक्ते बाबा महाराज खरतोडे यांच्यावर काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक अध्यक्ष शुभम निंबाळकर यांनी टीका केली होती या पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे संघटक ॲड.मंगेश लोंढे यांनी त्यांच्यावर टीका करीत जोरदार प्रत्युत्तर दिले ते म्हणाले की आपले वय व कर्तृत्व लक्षात घेऊन मर्यादित भाष्य करावे अन्यथा आम्ही जशास तसे उत्तर देऊ.ॲड. मंगेश लोंढे म्हणाले की शुभम निंबाळकर यांनी आपले स्वतःचे वय लक्षात घ्यावे तसेच आपला राजकारणातील अनुभव लक्षात घ्यावा.आपल्या बोलण्यावरून आपण बाष्कळ बडबड करीत असल्याचे दिसून येत आहे. ज्येष्ठ नेत्यावर टीका करताना भान ठेवावे.आमचे नेते हर्षवर्धन पाटील हे सर्वसामान्य व्यक्तीच्या विकासासाठी प्रयत्न करणारे सर्वमान्य नेतृत्व आहे. तुम्ही व तुमचे नेते विकासाचे केवळ पोकळ व खोटे आकडे फुगवून माहिती देत आहात.चुकीची व खोटी तसेच ज्येष्ठ नेत्यावर केलेली टीका आम्ही सहन करणार नाही जर तसे घडले तर आम्ही यास जसेच्या तसे उत्तर देऊ.
Home Uncategorized “कर्तुत्व नसणाऱ्यांनी ज्येष्ठ व्यक्तीवर बोलताना भान सांभाळावे अन्यथा जशास तसे उत्तर देऊ”-...