कर्जत प्रतिनिधी -धनंजय खराडे :कर्जत तालुक्यातील करमणवाडी,वायसेवाडी बारडगाव दगडी, बारडगाव सुद्रीक ,येसवडी, आखोणी, खैदान, खेड, गणेशवाडी,या भागात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे पाणीसाठ्यात भरपूर प्रमाणात वाढ झाली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंददायक वातावरण निर्माण झाले आहे.या पावसामुळे ऊस,बाजरी या पिकांना दिलासा मिळाला आहे तर काही प्रमाणात सतत पडणाऱ्या पावसामुळे काढणीस आलेल्या मका, सोयाबीन,उडीद अशा पिकांचे नुकसान पण झाले आहे.नवीन पेरणी होणाऱ्या पिकांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले असले तरी शेतकऱ्याला सतत येणाऱ्या पावसा मुळे शेती कामासाठी अडचण निर्माण होत आहे.तर सतत येणाऱ्या पावसामुळे काही पिके जलमय झाली आहेत.