करमाळ्यात बहुजन संघर्ष सेनेची तहसील कार्यालयासमोर राज्यपाल कोषारी व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या राजीनामा मागणी साठी निदर्शने..

करमाळा 🙁 प्रतिनिधी – देवा कदम) राज्यपाल भगतसिंग कोशारी व मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सरकारने राजीनामा घेतला पाहीजे या मागणीसाठी बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर भव्य निदर्शने करण्यात आली पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना करमाळा तहसीलदार समीर माने मार्फत मागण्यांचे निवेदन देण्यात आले निवेदन तहसीलदार समीर माने यांनी स्वीकारले कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देऊन परीसर दणाणून सोडला या वेळी राजाभाऊ कदम यांचे भाषण फारच आक्रमक झाले राजाभाऊ कदम म्हणाले राज्यपाल, मंत्री, आमदार यांनी महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह बोलण्याची मालिका सुरू केली आसताना केंद्र सरकार राज्य सरकार बघ्याची भुमिका घेत आहे कारवाई मात्र काहीच करत नाही या मुळे महाराष्ट्रातील जनते च्या मनांमध्ये सरकार विरूद्ध प्रचंड असंतोष व चिड निर्माण झाली आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे छत्रपति शिवरायांचे थेट वंशज उदयन राजे भोसले हे पत्रकार परिषदेत व्यथीत होऊन अश्रु डाहळतात हे पाहून महाराष्ट्रातील जनता भयंकर संतापली आहे सरकारने जनतेचा अंत पाहू नये नाहीतर महाराष्ट्रात उद्रेक होईल त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल.

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांबद्दल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भिक मागून शाळा उभ्या केल्या असे आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने महाराष्ट्रातील भीमसैनिक रस्त्यावर उत्तरला आणी भीमसैनिका मध्ये प्रचंड चीड निर्माण झाली त्याचा परीणाम शाई फेक मध्ये झाला मात्र भाजप सरकार अजूनही झोपेचे सोंग घेत आहे जो पर्यंत केंद्र सरकार राज्य सरकार राज्यपाल कोशारी व मंत्री चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत महाराष्ट्र शांत होणार नाही.आंदोलने होतच राहातील शेतकऱ्यांचे शेतमजूरांचे प्रश्न सोडवायचे राज्यातील विकास कामे करायची सोडून हे भाजपाचे वाचाळविर राज्यपाल, मंत्री, आमदार महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करतात यांना यांची जबाबदारी समजत नाही यांचे राजीनामे सरकारने घेतलेच पाहिजेत.
या वेळी मराठा सेवा संघाचे सचिन काळे,बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हा सचिव आप्पा भोसले, बहुजन विद्यार्थी संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रेमकुमार सरतापे यांची भाषणे झाली. आंदोलनकर्त्यांचे निवेदन तहसीलदार समीर माने यांनी स्वीकारले
या वेळी सरपंच देवीचा माळ दत्तात्रय रेगुडे, सरपंच आळजापूर रवी घोडके, सरपंच टाकळी कोंडीबा चीतारे, सरपंच पोतरे विष्णू रंधवे, सरपंच गोयेगाव दादा गायकवाड, सरपंच संदीप मारकड, बहुजन संघर्ष सेनेचे तालुका अध्यक्ष अंगद लांडगे, बहुजन संघर्ष सेनेचे शहराध्यक्ष आजिनाथ कांबळे, पप्पू ओव्हाळ, बहुजन संघर्ष सेनेचे करमाळा शहर सचिव कालिदास कांबळे, बहुजन संघर्ष सेनेचे तालुका सचिव मारुती भोसले, बहुजन विद्यार्थी संघर्ष सेनेचे तालुका अध्यक्ष निखिल खंकाळ, बहुजन विद्यार्थी संघर्ष सेनेचे तालुका सरचिटणीस स्वयंम जंजाळ, नितीन कोंडीबा गायकवाड, सिद्धार्थ गायकवाड, हनुमंत पिसाळ, प्रणव माने, अशोक शेळके, अनिकेत पिसाळ, ओंकार शिंदे, सागर सोनवणे, रोहित ठोंबरे, प्रशांत जाधव, महादेव भोसले, जनार्दन भोसले, अधिक शिंदे, सचिन चितारी, राजेंद्र शिंदे, गौतम कदम, विकास कदम, भागवत कदम, आबा कदम, मच्छिंद्र गायकवाड ,दादा कदम, मनोहर शिंदे,प्रदीप शिंदे, रोहित ठोंबरे, उमेश कदम, विक्रम निमगिरे, लहू भालेराव, भाऊ भोसले, महादेव कडाळे, संतोष चव्हाण, हनुमंत खरात, राहुल खरात, प्रेमचंद कांबळे, श्रीरंग लांडगे, किशोर गायकवाड, आदी शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here