महाराष्ट्र सेना चित्रपट आघाडी सोलापूर जिल्हाध्यक्षपदी सुप्रसिद्ध सिनेअभिनेते हनुमंत निमगिरे यांची निवड नुकतीच झाली. त्यामुळे करमाळा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेल्याने करमाळा तालुक्यात आणि सिनेसृष्टीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. हनुमंत निमगिरे हे जेऊर मध्ये वास्तव्यास असतात त्यांनी अनेक मराठी चित्रपट, वेब सिरीज, आणि मालिकांमध्ये काम केले आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत एक वेगळी छाप पाडली आहे . त्यांची कामाची आणि मनमिळाऊ स्वभावाची दखल घेऊनच त्यांची महाराष्ट्र सेना चित्रपट आघाडीच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. पश्चिम महाराष्ट्र चित्रपट आघाडीचे अध्यक्ष भीमसेन चव्हाण व महाराष्ट्र सेना चित्रपट आघाडीचे संस्थापक अध्यक्ष व लोकनेते मा. राजूभाई साबळे व इतर दिग्गज लोकांच्या उपस्थितीत हनुमंत निमगिरे यांना नियुक्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे ठिकठिकाणी करमाळा व संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांचा सत्कार समारंभ आयोजित होत आहेत. फोनद्वारे सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आणि लवकरच त्यांचा नवीन प्रोजेक्ट चे शूटिंग सुद्धा चालू होत आहे.जनता एक्सप्रेस मराठी न्यूज कडून त्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
Home Uncategorized करमाळा तालुक्यातील हनुमंत निमगिरे यांच्या शिरपेचात महाराष्ट्र चित्रपट सेना आघाडीच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष...