करमाळा ( प्रतिनिधी देवा कदम ): करमाळा तालुक्यात नुकतीच एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे या बातमीने पंचक्रोशी मध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.तालुक्यातील उजनीच्या काटावर चिखलठाण येथे दोघेजण पाण्यात बेपत्ता झाले आहेत. शुक्रवारी (ता 14) सकाळी 11 वाजताच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
यातील एकजण हा मुंबई येथील असल्याचे समजत आहे. हे दोघे सकाळी उजनीकाटी फिरण्यासाठी गेले होते. यातील एकजण हा मच्छिमार आहे. मुंबईतील तरुणाने पोहण्यासाठी उडी मारली मात्र त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. त्याला काढण्यासाठी दुसर्याने उडी घेतली असे समजत आहे.दोघेही पाण्यात बेपत्ता झाल्याचे समजताच गावकर्यांनी त्यांचा शोध सुरु केला आहे. त्यासाठी नदीकाठी गर्दी केली आहे. करमाळा पोलिसही घटनास्थळी दाखल होत आहेत.