करमाळा प्रतिनिधि (देवा कदम)
केमसाठी उजनीवरून येणाऱ्या मुख्य पाणीपुरवठ्याच्या जलवाहिनीवर केम येथील काळे वस्ती व गुटाळ वस्तीवर काहीजणांनी एअर वॉल वर अनेख बेकायदेशीर नळ बसवून येथील नागरिकांनी पाणी चोरून पाण्याचा दुरुपयोग चालू केला आहे.ही जलवाहिनी मुख्य जलवाहिनी असल्यानं या जलवाहिनीचे पाणी चौवीस तास सुरू असते आणि त्यामुळे येथे पाण्याच नुकसान खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे केम गावच्या पाणीपुरवठा विभागवार ताण येत आहे गावातील नागरिकांना अगोदरच एक दिवसाआड पाणी येत आहे. त्यात आत्ता या बेकायेशीररित्या घेतलेल्या नळ कनेक्शन मुळे पाणी कमी पडत आहे. आणि याचा नागरिकांना त्रास होत आहे त्यामुळे तात्काळ या बेकायदेशीर नळ केक्शन वर केम ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागाने कारवाई करून या पाण्याचा दुरुपयोग थांबवावा नाही तर आंदोलन केल्याशिवाय गावातील नागरिक गप्प बसणार नाहीत असा आदेश केम ग्रामस्थांनी दिला आहे.