पळसदेव (ता.इंदापूर) येथील गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल .जी.बनसुडे विद्यालयातील 17 वर्षे वयोगटातील मुलींनी पुणे ग्रामीण विभागांमध्ये कबड्डी स्पर्धेत 64-17 फरकाने विजय मिळवला व 19 वर्षे वयोगटातील मुलांनी कबड्डी स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला.तसेच क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर व कडलास हायस्कूल कडलास यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित पुणे विभागीय शालेय कबडी स्पर्धा 2023/24 या स्पर्धेत एल .जी.बनसुडे विद्यालयाने 17 वर्ष वयोगटांमध्ये मुलींनी पुणे ग्रामीण कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक व 19 वर्षे वयोगटांमध्ये मुलांनी द्वितीय क्रमांक मिळवून दैदिप्यमय यश संपादन केले. कबड्डी स्पर्धेत मुलींच्या संघामध्ये प्रामुख्याने रचना बांडे ,वर्षा बनसुडे,रामेश्वर शेलार ,मानसी बनसुडे, समृद्धी बनसुडे,अमृता शेलार, ऋतुजा भुजबळ,पुजा घनवट,अमृता जगताप, आरती घनवट ,प्रिया गाढवे ,सिद्धी बोराटे , या खेळाडूंचा समावेश होता या सर्व खेळाडूंचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक सागर बनसुडे व रुपेश भालेराव यांचे संस्थेचे अध्यक्ष हनुमंत बनसुडे उपाध्यक्ष शितल कुमार शहा कार्याध्यक्ष नंदाताई बनसुडे ,सचिव नितीन बनसुडे ,प्राचार्य वंदना बनसुडे ,मुख्याध्यापक राहुल वायसे, संस्थेचे विश्वस्त,सर्व विभागाचे विभाग प्रमुख, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी हार्दिक अभिनंदन केले.
Home Uncategorized कबड्डी स्पर्धेत एल .जी.बनसुडे विद्यालयातील मुला-मुलींचा गाजावाजा, नेहमीप्रमाणे या स्पर्धेतही अव्वल स्थान.