इंदापूर तालुक्यासह पंचक्रोशी मध्ये भाऊसाहेब आंधळकर यांचे कट्टर समर्थक ओळखले जाणारे पैलवान अशोकराव देवकर यांची शिवसेना शिंदे गटाच्या इंदापूर शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
गेल्या अनेक वर्षापासून इंदापूर तालुक्यात अशोक देवकर हे शिवसेनेचे काम करत होते. समाजातील अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी शिवसेने केलेल्या आंदोलनामध्ये ते सक्रियरित्या सहभागी होत असत. इंदापूर शहरासह इंदापूर तालुका व इतर तालुक्यातही त्यांनी युवकांची एक फळी अग्रेसर करून भाऊसाहेब आंधळकर यांच्या पाठीशी उभा राहण्याचे काम केले होते परंतु काही दिवसापूर्वी भाऊसाहेब आंधळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शिंदे गटात सामील झाल्याने भाऊसाहेब आंधळकर यांच्या सूचनेनुसार पैलवान अशोक देवकर यांनी शिंदे गटात सक्रिय झाले.
काल माजी मंत्री विजय बापू शिवतारे यांनी अशोक देवकर यांना शहराध्यक्षपदी निवडीचे पत्र दिले. त्याचप्रमाणे माजी मंत्री विजय बापू शिवतरे यांनी अशोक देवकर यांना पूर्णपणे ताकद देणार असून येणाऱ्या काही दिवसातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भेट घालून देण्याचे ही आश्वासन दिले.
जनता एक्सप्रेस मराठी न्यूजशी बोलताना अशोक देवकर यांनी सांगितले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात गेल्याचा मला आनंद होत आहे भाऊसाहेब आंधळकर हे माझे प्रेरणास्त्रोत असून येणाऱ्या काळात इंदापूर तालुक्यामध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाच्या अनेक शाखा स्थापन करून शिवसेनेचा झंजावात तालुक्यात करणार असल्याचे अशोक देवकर यांनी सांगितले.यावेळी दुर्गा दादा शिदे,रामभाऊ कांबळे,बल्ली गायकवाड,अण्णा पाटील,बापू गंलाडे,राहुल निकम व इतर कार्यकर्त्यांसह अशोक देवकर यांचा तालुक्यातील मित्र परिवार उपस्थित होता.
Home Uncategorized कट्टर भाऊसाहेब आंधळकर समर्थक पै.अशोकराव देवकर यांची शिवसेना(बाळासाहेब ठाकरे) इंदापूर शहराध्यक्षपदी निवड.