करमाळा शहर प्रतिनिधी: सविता आंधळकर
करमाळा तालुक्यातील कुंभेज फाटा ते बाभळु गाव येथील रस्ता दुरुस्तीचे काम गेल्या काही दिवसांपासून मंदगतीने चालू आहे . रस्तादुरुस्तीची अंतीम मुदत ही मार्च २०२१ मध्ये संपली असून अजुनही काम अर्धवटच आहे .त्यामुळे वाहनचालकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. वर्दळीच्या या रस्त्याची दयनीय अवस्था असल्याने गावकऱ्यांसह वाहनचालक त्रस्त झाले आहेत.ऊर्वरीत कामासाठी ठेकेदाराला मुदतवाढ दिली असुन कामास विलंब केल्याने ठेकेदारास करारानुसार त्र्यांनव्वलाख रुपये दंड करण्यात आला आहे तसेच उर्वरीत काम मे २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत असे स्पष्टीकरण निरंजन तेलंग अभियंता , सार्वजनिक बांधकाम विभाग अकलुज यांनी दिले आहे . दिलेल्या माहिती नुसार कामाला गती येणार का ! आणि काम अंतिम मुदतीच्या अगोदर पुर्ण होणार का हे पाहण नक्कीच उस्तुकता वर्दक ठरेल.