ओबीसी आरक्षण,पुणे येथील भिडे वाड्याच्या प्रलंबित विषय,राजकीय आखणीसाठी माळी समाज बांधव एकत्र येणार..

महाराष्ट्र राज्य माळी समाजातील प्रमुख पदाधिकारी यांची बैठक शनिवार दि.४/६/२०२२ रोजी दुपारी १२ वाजता तळेगाव ढमढेरे येथे जेष्ठ नेते मुरलीधर (नाना) भुजबळ यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली आहे.या बैठकीसाठी माळी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय समाज कार्य करणाऱ्या प्रमुख पदाधिकारी यांना निमंत्रित करण्यात आले आहे.या बैठकीत माळी समाजातील तळेगाव ढमढेरे येथील नंदाताई भुजबळ यांची महा ऑरगॅनिक ॲन्ड रेश्युड्यु फ्री फार्मर्स असोसिएशन च्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे.त्याबरोबरच बैठकीत ओबीसी आरक्षण, पुणे येथील भिडे वाड्याच्या प्रलंबित विषयवार चर्चा व माळी समाज्यावरती राजकीय क्षेत्रात होणा-या कुरघोड्या वरती चर्चा करण्यात येणार आहे.या बैठकीला मुंबई हाय कोर्ट चे ॲड.नितीनजी राजगुरू, नानासाहेब ननवरे ,महेश भाऊ गोरे, मुरलीधर भुजबळ, रूपाली ताई रायकर, बापूसाहेब बोराटे, संजय जकाते, ज्ञानदेव शिंदे, राजेंद्र गोरे, बंडू जाधव,विधाते साहेब,भारतीताई आल्हाट,प्रितम खेरडे, धनंजय जाधव, गणेश ताजणे,नंदाताई भुजबळ, गणेश गायकवाड, स्वप्नाताई लोणकर,मनोज गुंजाळ, प्रमीलाताई चवरे,सुरेखा ताई होले, कविता ताई जकाते, वैशाली सिनलकर, सीमाताई पांढरे, सुनिल जाधव, अतुल ननवरे, बाळासाहेब झगडे,उमेश गायकवाड, सुनिल बनसोडे,लक्ष्मण शिंदे,किरण वाघ, महादेव शिंदे, अनिकेत अदलिंगे, सुशीलकुमार शिंदे, दादा माळी, सौरभ लिंगे, गजेंद्र जाधव, कमलाकर फुले,मसुराज राऊत, दशरथ राऊत,पोपट गायकवाड, राहूल वसेकर, विक्रम माळी, विकास खेडकर, संतोष खेडकर,मंदाकिनी कळमकर,निर्मला भुजबळ, संतोषी कळमकर,गणेश भगवान गायकवाड़ , ओंकार बिरदवडे,शंकर झगडे, महेश बनकर, महेश शिंदे, प्रकाश माळी,संतोष झुरंगे, संतोष माळी याबरोबरच इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here