गीता शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्षा नंदा बनसुडे यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने विजय स्पर्धकांना चषक , मेडल , प्रमाणपत्र वाटप.
पळसदेव:दि 14 पळसदेव येथील एलजी बनसुडे विद्यालयात यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सवातील भिगवण बीट पातळीवरील स्पर्धा संपन्न झाल्या. विस्तार अधिकारी हनुमंत शिंदे , केंद्र प्रमुख नवनाथ ओमासे , गीता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हनुमंत बनसुडे , नंदा बनसुडे , सुनील वाघ , भारत बांडे , सचिन गायकवाड , प्राचार्य वंदना बनसुडे , मुख्याध्यापक राहुल वायसे , सचिव नितीन बनसुडे यांचे हस्ते सावित्रीबाई फुले व यशवंतराव चव्हाण यांचे प्रतिमा पुजन दीपप्रज्वलन स्पर्धा उद्घाटन करण्यात आले.यावेळी गीता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हनुमंत बनसुडे यांनी मुलांचे कौतुक केले. गुणवत्तेबरोबर कला , क्रीडा क्षेत्रात देखील नावलौकिक मिळवता येतो. असे सांगितले. विस्तार अधिकारी हनुमंत शिंदे यांनी प्रास्ताविक केले.यावेळी 1 ली 5 वी लहान गट व 6 वी ते 8 वी मोठा गट मुले व मुली लोकनृत्य , लेझीम , खो खो , कबड्डी , भजन अशा सांघिक व 100/50 मी धावणे , लांब उडी , उंच उडी ,गोळा फेक , थाळी फेक , वक्तृत्व , प्रश्नमंजुषा या सर्व स्पर्धा झाल्या.विजेत्या तीन क्रमांक चषक , प्रमाणपत्र व मेडल एल.जी. बनसुडे विद्यालय वतीने देण्यात आले. तसेच राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत उत्कृष्ट खेळी करणाऱ्या एल.जी विद्यालय पळसदेव मधील खेळाडूंचा तसेच मार्गदर्शक शिक्षक सागर बनसुडे व रुपेश भालेराव यांचा सत्कार करण्यात आला.
सर्व स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी एल.जी. बनसुडे विद्यालयातील सर्व विभाग प्रमुख व शिक्षकांनी परिश्रम घेतले.यावेळी भिगवण बीट मधील वरकुटे , न्हावी , डाळज व तक्रारवाडी केंद्रातील स्पर्धक मुले , मार्गदर्शक शिक्षक , पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवेदन संतोष हेगडे यांनी केले आभार मदने सर यांनी मानले.