संतोष तावरे:इंदापूर प्रतिनिधी
इंदापूर:कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीसाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज दिनांक २३ सप्टेंबर रोजी दोन ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखालील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू असून अर्ज दाखल करण्याचा आज दुसरा दिवस आहे. एकूण २१ जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे.
माजी मंत्री पाटील यांनी ऊस उत्पादक कालठण गटातून एक अर्ज दाखल केला असून दुसरा अर्ज ब वर्ग प्रतिनिधी म्हणून दाखल केला आहे. या निवडणूक संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस ला योग्य उमेदवार मिळत नसल्याची चर्चा चालू आहे.
माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अर्ज दाखल करतेवेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे ,निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील, ज्येष्ठ नेते देवराज जाधव ,तहसीलदार श्रीकांत पाटील,सहाय्यक निबंधक जेपी गावडे,मयुरसिंह पाटील उपस्थित होते.
तर दुसरीकडे वरकुटे पाटी येथील शिवशंभो पॅलेसमध्ये शिवसेना तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची इंदापूर सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भात बैठक चालू असून या बैठकीमध्ये निवडणूक लढवायची की नाही याबाबत प्रत्येकाचे मत जाणून घेणार असल्याचे शिवसेना तालुकाप्रमुख नितीन शिंदे यांनी जनता एक्सप्रेस मराठी न्यूज च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. इंदापूर तालुक्यातील शिवसेना आणि भाजपा यांच्यातील मैत्री ही लपून राहिलेली नसून जरी काही शिवसैनिकांचे निवडणूक लढवण्याचे मत असेल तरी शिवसेना तालुकाप्रमुख व इंदापूर तालुक्यातील शिवसेनेचे प्रमुख नेतेमंडळी निवडणूक लढण्यास तयार नसल्याचे खात्रीशीर वृत्त हाती आली आहे. या सर्व गोष्टी हाती लागले असल्या तरी आज संध्याकाळी ६ वाजेपर्यंत शिवसेनेचा निवडणुकीविषयी चा निर्णय जाहीर होईल अशी चर्चा आहे.या बैठकीला पुणे जिल्हा समन्वयक विशाल बोंद्रे, उपजिल्हाप्रमुख संजय काळे, तालुकाप्रमुख नितीन शिंदे, शिवसेना ज्येष्ठ नेते भीमराव आप्पा भोसले, मेजर महादेव सोमवंशी अवधूत पाटील व मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित आहेत.