इंदापूर: आज दिनांक 5/1/2024 रोजी विभाग 3 ब मौजे इंदापूर या गावांमध्ये पांडुरंग वामन निगडे यांच्या शेतात सकाळी 9.30 वाजता शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर. केंद्राचा फिरता दवाखाना ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी करण्यासाठी आला होता आरोग्य तपासणी चालू होती. अचानक इंदापूर तालुक्यातील धडाडीचे शिवसृष्टीचे संपादन मा. श्री.धनंजय कळमकर साहेब यांनी ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी चालू आहे तेथे येऊन आपला वाढदिवस साजरा करायचा असा निश्चय त्यांनी केला होता तेथे आले असता, त्यांच्याबरोबर अनेक मान्यवर पत्रकार व धडाडीचे पत्रकार कैलास भाऊ पवार यांनी वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे नियोजन केले होते .ऊसतोड मजुरांसाठी ऊबदार कपडे व साडया महिलांसाठी साड्या वाटप लहान मुलांना खाऊ वाटप आणि ऊसतोड मजुरां समवेत वाढदिवसाचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला त्यामध्ये ट्रस्टचे सल्लागारह हमीदभाई आत्तार ,ह.चांदशाहवली बाबांच्या उरूस कमिटीचे अध्यक्ष आझादभाई पठाण,यांनी महिलांसाठी साड्या व उबदार कपडयांचे वाटप केले, धरमचंद लोढा शेठ यांनी फरसाण आणि चॉकलेटचे वाटप केले, तेजपृथ्वी ग्रुपच्या प्रमुख अनिताताई खरात यांनी मुलांना बिस्किट वाटप केले, ऊसतोड मजुरांच्या समवेत आगळा वेगळा वाढदिवस साजरा करण्यात आला, यावेळी ऊसतोडणी मजुरांच्या लहान मुलांना केकचे वाटप केले गेले . वाढदिवस साजरा करण्यासाठी. ऊसतोड मालकांनी जय्यत तयारी केली होती पांडुरंग निगडे यांनी वाढदिवसानिमित्त सर्वांना अल्पोपहार दिला.ट्रॅक्टर मालक भारत गडदे, कर्मयोगी चे कर्मचारी के आर.बाळगानुरे परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते शिवाजी कचरे, संतोष म्हेत्रे ;अतुल गायकवाड ;हरी वामन निगडे, धनेश निगडे किसन मोहिते, तसेच केंद्राच्या डॉ.सारंगी कुंभार नर्स दिव्या कुमरे, दिव्या लांडे ,नितेश बेटेकर केंद्राचे प्रमुख महादेव चव्हाण सर या सर्वांच्या उपस्थिती मध्ये आरोग्य तपासणी पूर्ण झाली.