गेल्या दोन वर्षांपासून कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रवाहामुळे राज्यातील नव्हे तर देशातील सर्व च सन उत्सव ठप्प झाले होते.दोन वर्ष कोणत्याच प्रकारचा आनंद उत्सव पार पडला नाही.
करमाळा तालुक्यातील उमरड या गावात येथे दर वर्षी प्रमाणे यंदाही अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.या सप्ताहाची सुरुवात वार – बुधवार दि.३/०८/२०२२ पासून वार – मंगळवार दि.०९/०८/२०२२ या कालावधीपर्यंत चालणार आहे.गेल्या कित्येक वर्षापासून ह भ प.हुंबे गुरुजी यांच्या प्रेरणेतून चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा मोठ्या उत्साहात पार पाडला जातो.यंदाही त्याच उत्साहात हा सोहळा पार पाडणार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे.उमरड हे गाव पूर्वीपासूनच संप्रदायातील असल्याचे तसेच या गावात नामवंत कलाकार मंडळी असल्याचे ही दिसून येते.या अखंड हरिनाम सप्ताहात नामवंत कीर्तन कार व समाज प्रबोधन करणाऱ्या कीर्तन करांच्या कीर्तनाचे आयोजन केले आहे, व व्यासपीठ चालक ह भ प.सुभाष महाराज बदे हे आहेत. व काल्याचे कीर्तन ह भ प.रामभाऊ महाराज निंबाळकर.(बीटरगाव) यांचे होणार आहे.या सप्ताहात साऊंड सिस्टीम व लाईट व्यवस्था आकाश साऊंड सर्व्हिस अंजनडोह यांच्याकडे आहे. आणि साई कलेक्शन चे मालक प्रो. प्रा.शांतीलाल बाबुराव वलटे यांनी जाहिरातीचे आयोजन केले आहे.उमरड व उमरड पंचक्रोशीतील सर्व मंडळींनी या सप्ताहाचे नियोजन केले आहे.