👉 या बंडखोरीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ग्रामपंचायत सदस्य नाराज
उपसंपादक निलकंठ भोंग
निमगाव केतकी येथील उपसरपंच निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार अलका माणिक भोंग यांचा बंडखोर सदस्यांनी पाठिंबा दिलेले उमेदवार मीना भोंग यांनी पराभव केल्याने निमगाव केतकी येथील सरपंचासह ग्रामपंचायत सदस्य ही नाराज झाले आहेत.आमदारकीच्या वेळेस दोन वेळा दत्तात्रय भरणे यांना लीड देणाऱ्या गावांमध्ये निमगाव केतकीचा समावेश होतो परंतु अशा बंडखोरीने नाराज झालेले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य मामांचे काम करतील का असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
यावेळी बोलताना ग्रामपंचायत सदस्य अमोल हेगडे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बंडखोर उमेदवारांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा झालेला पराभव हा पक्षाचा पराभव आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्या पॅनल मधून निवडून आलेले उमेदवार मीना दीपक भोंग, तात्यासाहेब वडापुरे, अमोल राऊत यांच्यावरती भरणे मामा कारवाई करणार का अशी मागणी निमगाव केतकी येथील राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायत सदस्यांनी तसेच मामांवरती प्रेम करणाऱ्या निमगाव केतकी येथील असंख्य कार्यकर्त्यांनी केली आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकांमध्ये सरपंचाना बरोबर घेऊन आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्य इतर पक्षाचा विचार करणार असून लवकरच याबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
Home Uncategorized उपसरपंच निवडीमध्ये राष्ट्रवादीच्याच बंडखोर सदस्यांकडून राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव.