इंदापूर: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया इंदापूर तालुका व दलित इंडिया चेम्बर्स कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांच्या वतीने 13 मार्च रोजी भव्य उद्योग व्यवसाय भांडवल मार्गदर्शन शिबिर इंदापूर येथे अनिल होवळे, ललित बनसोड, अविनाश जगताप सदस्य कोर कमिटी पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे इंदापूर तालुका अध्यक्ष संदीपान कडवळे सर होते यावेळी इंदापूर तालुका इंदापूर शहर मधून अनेक नवीन व्यवसाय उद्योग करणारे सुशक्षित युवक आणि उद्योग व्यवसायाचे कर्ज प्रकरण, सबसिडी ,सरकारच्या नवीन योजना लागणारी कागदपत्रे या विषयी सखोल माहिती अनिल होवळे यांनी दिली. यावेळी अनिल होवळे बोलताना म्हणाले की, पुढील महिन्यात एक दिवसीय कार्यशाळा घेऊ आणि संपूर्ण सहकार्य युवकांना आणि उद्योग व्यवसाय करणाऱ्या युवकांना करू अशी ग्वाही त्यानी दिली, उद्योग व्यवसाय क्षेत्रांमध्ये उतरून चांगले कार्य केल्यास नक्की यश मिळेल ,उद्योग व्यवसायासाठी लागणारे भांडवल म्हणजेच कर्ज प्रकरण एखाद्या बँकेने अडवणूक केल्यास त्यासाठी स्वतः लक्ष घालण्याचे आश्वासन देण्यात आले, या शिबिरास महिला युवक वर्ग मोठ्या प्रमाणात हजर होता रिपाईचे पुणे जिल्हा संघटक सचिव शिवाजीराव मखरे ,नगरपालिका गटनेते कैलास कदम ,भाजप शहराध्यक्ष शकील भाई सय्यद ,राजा भाऊ घाडगे ,अमोल मिसाळ ,गफूर भाई सय्यद ,नितीन झेंडे ,नितीन आरडे पाटील ,एडवोकेट असिफ बागवान, शंकर घाडगे सर ,श्रीजा इंटरप्राईजेस चे प्रमुख प्राध्यापक जीवन सरवदे ,भरत भागवत ,पुणे जिल्हा रिपाईच्या युवती जिल्हा अध्यक्ष सुप्रिया ताई वाघमारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या सर्व प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले.