इंदापूर: खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते व माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली उद्या शेटफळ हवेली येथे तब्बल 1 कोटी 99 लाख रुपये किंमतीची जलजीवन मिशन नळ पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन व माध्यमिक विद्यालय शेटफळ हवेली येथे शिक्षक,विद्यार्थी व पालक संवादाचा कार्यक्रम होणार आहे. शेटफळ हवेलीच्या या उद्घाटन शुभारंभ आगोदर म्हणजेच ठीक दुपारी १२:०० वा.माध्यमिक विद्यालय,शेटफळ हवेली या शाळेस सुप्रिया सुळे यांची सदिच्छा भेट देणार असून पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार मुख्यमंत्री असताना ज्या ३२ शाळांना मंजुरी दिली होती त्यापैकीच ही एक शाळा आहे,म्हणून “आपला मतदार संघ,आपला अभिमान” या उपक्रमाअंतर्गत शिक्षक,विद्यार्थी व पालकांशी खास संवादही यावेळी होणार आहे.
माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील कानाकोपऱ्यामध्ये रस्त्यांचे जाळे पसरून इंदापूर तालुक्यातील गाव-गाव व वाड्या वस्त्या जोडण्यामध्ये राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यशस्वी झाले आहेत. व शेटफळ हवेली वर त्यांचे विशेष लक्ष असल्याने या गावासाठी निधी कमी पडू देणार नाही असेही राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जनता एक्सप्रेस मराठी न्यूजशी बोलताना माहिती दिली.एकंदरीतच शेटफळ हवेली येथील विविध विकासकामांचा भूमीपूजन व उद्घाटन समारंभ खा.सुप्रिया सुळे (संसद महारत्न खासदार,बारामती लोकसभा मतदार संघ) यांचे “शुभहस्ते” व मा.ना.श्री.दत्तात्रय (मामा) भरणे (माजी राज्यमंत्री,महाराष्ट्र राज्य) यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून या प्रसंगी प्रदिप गारटकर (जिल्हाध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) यांचेसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन गावचे सरपंच व ग्रामपंचायत तसेच माध्यमिक विद्यालय शेटफळ हवेलीच्या वतीने करण्यात आले आहे.
Home Uncategorized उद्या खा.सुप्रिया सुळे यांच्या हस्ते शेटफळ हवेली येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 1...