जनता एक्सप्रेस मराठी न्युज दौंड प्रतिनिधी
अजय तोडकर मो.7776027968
यवत : आज 18 सप्टेंबर उंडवडी तालुका दौंड जिल्हा पुणे या गावांमध्ये भारतीय जैन संघटनेच्या आणि प्राथमिक आरोग्य केंद्र राहू यांच्या सहकार्याने कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस ग्रामस्थान्नी घेतला.सुमारे 380 ग्रामस्थांनी याचा लाभ घेतला.
लसीकरण मोहिमेचा प्रारंभ आज सकाळी दहा वाजता उंडवडी गावच्या प्राथमिक शाळेमध्ये सरपंच सौ. दीपमाला जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. सुरुवातीला पहिली लस ग्रामपंचायत उपसरपंच विकास कांबळे यांनी घेतली. यावेळी उपस्थित मान्यवर मा. उपसरपंच विकास सोनवणे,विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मैनाताई गुंड,रूपाली होले, वंदना दोरगे,विमल जाधव,चिंतामण लोहकरे, सुनिल नवले,सुनिल जगताप मा.ग्रामपंचायत सदस्य वसंत कांबळे,भिकू कांबळे,रोहिदास जाधव,रामचंद्र दोरगे, महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्ष दिनेश गडदे, मा. सदस्य जयसिंग होले, सतीश जाधव,अविनाश शिर्के, किसन वाघले, किरण कांबळे, धंनजय होले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
भारतीय जैन संघटनेचे दौंड तालुका समन्वयक श्री मयूर सोळस्कर यांचे या कार्यक्रमास विशेष सहकार्य लाभले.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुरेखा पोळ मॅडम आणि राहू येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ पांढरे सर यांच्या मार्गदर्शनखाली आरोग्य सहाय्यक संभाजी कोकडे, संतोष भोपळे, हेल्थ अधिकारी डॉ आकांक्षा, डॉ नेहा, आरोग्यसेविका पूजा खोड, आरोग्य सेवक जितेंद्र शेंडगे, डॉ वांडरे, तसेच उंडवडी आशा सेविका, अंगणवाडी सेविका, प्राथमिक सेविका उपस्थित, ग्रामपंचायत कर्मचारी माणिक कांबळे, कॉम्पुटर ऑपरेटर दीपाली कांबळे आदीनी परिश्रम घेतले.लसीकरण कॅम्प पुणे जिल्हा परिषद आणि भारतीय जैन संघटनेचे च्या संयुक्त विद्यमाने कोरोना मुक्त गाव अभियानच्या अभियान अंतर्गत उंडवडी ग्रामपंचायत ने केलेल्या कोरोना नियंत्रण कक्ष च्या पाचही समितीतील सदस्यांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य केले.