इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या वतीने गुणगौरव समारंभ संपन्न.इंदापूर पंचक्रोशीतील अनेक दिग्गज पुरस्काराने सन्मानित.

सोमवार दिनांक 11/9/2023 रोजी इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या वतीने जाहीर नागरी सत्कार समारंभअल्पबचत सभागृह पंचायत समिती इंदापूर येथे दुपारी १२ वाजता आयोजित केला होता कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. डाॕ. रत्नाकर महाजन महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळ मा. कार्याध्यक्ष यांच्या शुभहस्ते तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री भारत आबा शिंदे सदस्य सोलापूर जिल्हा परिषद यांच्या हस्ते जाहीर नागरी सत्कार समारंभ बेस्ट कॉलेज ऑफ महाराष्ट्र पुरस्कार मिळाल्याबद्दल जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग इंदापूर संस्थेचे *अध्यक्ष मा. श्री जयवंत नायकुडे सर यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला इंदापूर शहरामध्ये उल्लेखनीय सामाजिक कार्य केल्याबद्दल विशेष पुरस्कार प्रधान करण्यात आले.इंदापूर भूषण माननीय धरमचंद लोढा भारतीय जैन संघटना शहराध्यक्ष इंदापूर. इंदापूर वैभव हा पुरस्कार माननीय दत्तात्रेय गुजर सर जेष्ठ नागरिक संघ संस्थापक अध्यक्ष. आदर्श समाजसेवक मा. रमेश आबा शिंदे कार्याध्यक्ष राष्ट्रसेवा दल पुणे जिल्हा. योग गुरु पतंजली माननीय प्रशांत गिड्डे सर, आदर्श व्यापारी मा. संतोष शेठ भागवत. आधुनिक श्रावण बाळ मा. महेंद्र गुंदेचा. एकात्मता व धर्मनिरपेक्षता हा पुरस्कार माननीय हमीद भाई आतार यांना देण्यात आला. आदर्श माजी सैनिक मेजर महादेव सोमवंशी, मेजर आमोद कुलकर्णी ऑपरेशन रक्षक,गुरुवर्य प्राध्यापक अरुण अरुण दा ढवळे वाड्मय पुरस्कार लेखक प्राध्यापक महादेव चव्हाण सर यांना देण्यात आला. आदर्श महिला बचत गट सौ कुमुदिनी कडवळे पंचशील महिला बचत गट. संस्कृत हिंदी मराठी इंग्रजी भाषा तज्ञ हा पुरस्कार डॉक्टर राणी ताटे करावे. अनाथांचा नाथ हा पुरस्कार माननीय बाळासाहेब क्षिरसागर माजी विद्यार्थी रिमांड होम बारामती.
वयाची 88 वर्ष होऊन सुद्धा इंदापूरकरांच्या प्रश्नांसाठी 175 दिवस धरणे आंदोलन करून संघर्ष पुढे चालू ठेवणाऱ्या . संघर्षशील पुरस्कार.–श्री रघुनाथ दादा खरवडे आणि अर्जुन शिंदे ज्येष्ठ नागरिक यांना देण्यात आला.सामाजिक कार्यकर्ते म्हणून माननीय अशोक ननवरे माननीय प्रदीप पवार माननीय बापू गायकवाड. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा वीरश्री मालोजीराजे भोसले यांचा पुतळा बनवून इंद्रेश्वर मंदिरात बसवणाऱ्या ज्येष्ठ ज्ञानदेव जामदार यांना विशेष पुरस्कार. एचआयव्ही, कॅन्सर, टेबी , या रुग्णांसाठी विशेष मदत पुरस्कार. संकल्प मानव सेवा ट्रस्टचे अध्यक्ष श्री संतोष भाऊ जामदार यांचा विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी इंदापूर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष सौ अलका ताई ताटे, लता ताई नायकुडे, सायरा भाभी आतार, लोढा मॅडम, सोमवंशी मॅडम, शिंदे मॅडम, भागवत मॅडम, इंदापूर शहरातील अनेक महिला उपस्थित होत्या.नुकतेच एलएलबी ची डिग्री घेतलेले नवीन वकिली व्यवसायामध्ये आलेले आमचे मित्र ॲड.सिद्धार्थ मखरे-यांचा सत्कार करण्यात आला.समाजवादी चळवळीचे नेते संभाजी शंकर व्यवहारे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.एकच ध्यास इंदापूरचा विकास या संकल्पनेतून इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीने भव्य दिव्य असा नागरी सत्कार आणि इंदापूर शहरामध्ये उल्लेखनीय सामाजिक कार्य केल्याबद्दल विशेष पुरस्कार देण्यात आले. तसेच संघर्ष समितीचे 88 वर्षाचे शेलार मामा इंदापूर शहराच्या प्रश्नासाठी दोन लढवय लढत आहेत अशा दोघांनाही विशेष पुरस्कार देण्यात आला. वीरश्री. मालोजीराजे भोसले यांच्या पवित्र इंदापूर मधील मालोजीराजांची पुतळा बसवण्याचे धाडसी कार्य केले, आशा थोर व्यक्तींना पुरस्कार देण्यात आला.अशा विविध पुरस्कारातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम कार्यक्रमाचे संयोजक प्राध्यापक कृष्णा ताटे सर यांनी हे सर्वसामान्यांना पुरस्कार देऊन महान कार्य केले. हे कधीही कोणीही विसरू शकत नाही. इंदापूर शहरामध्ये आतापर्यंत असा कार्यक्रम झाला नाही. न भूतो न भविष्य असाच कार्यक्रम झाला. इंदापूरकर नागरिकांनी या कार्यक्रमासाठी प्रचंड गर्दी केली होती. इंदापूरकरांची मोठी साथ या कार्यक्रमास लाभली. त्यामुळे इंदापूरकरांचे मनस्वी आभारही मानण्यात आले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here