माढा तालुका प्रतिनिधी:नसीर बागवान
कालच इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी येथे बारामती विमानतळावरील प्रशिक्षणात वापरले जाणारे विमान कोसळले होते. नशिबाने या घटनेत कोणतीही मनुष्यहानी झालेली नाही. विमान दुर्घटनेचे हे प्रकरण ताजे असतानाच आज माढा तालुक्यातील वडशिंगे गावाच्या बाजूला दुपारी साडेबाराच्या सुमारास आकाशातून चाललेल्या काळ्या रंगाच्या विमानातून एक भला मोठा व भयानक स्फोटाचा आवाज पंचक्रोशीत ऐकू आला. हा आवाज इतका भयंकर होता की आजूबाजूच्या पंचक्रोशीतील शेतात काम करणारी शेतकरी व मजूर सैरावैरा धावू लागले होते व आडोसा शोधत होते. हा आवाज माढा,वैराग आणि बार्शी इथपर्यंत पोहचला होता.
एवढा मोठा आवाज असला तरी हा नक्की आवाज कशामुळे झाला याचे उत्तर मात्र अजून मिळाले नाही.हा आवाज बॉम्ब पडल्यासारखा होता त्यामुळे परिसर खूप भयभीत झाला होता. हे विमान कोणत्या संस्थेचे किंवा कोणत्या देशातून आले होते याची आता पंचक्रोशी मध्ये चर्चा जोरात रंगली आहे. याबाबत प्रत्यक्षदर्शी वडशिंगे गावचे शिवारात ऊस लागवड करणारे शेतकरी काम करत असताना पाणी पिण्यासाठी विश्रांती घेण्याच्या वेळी त्यांना आकाशातून एक मोठा आवाज आला अशी माहिती तेथील स्थानिक शेतकऱ्यांनी दिली. प्रशासनाला विचारणा केली असता याबाबतचा स्फोट कशामुळे झाला याचा शोध चालू आहे तसेच विमान कुठले होते याचाही शोध घेणे सुरू आहे असे प्रशासनात मार्फत सांगण्यात आले.
एकंदरीतच काल इंदापूर तालुक्यात घडलेल्या विमान दुर्घटना घटनेनंतर आज माढा तालुक्यात व पंचक्रोशीत एवढ्या मोठ्या स्वरूपाचा स्फोटक आवाज आल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले होते.
Home कुर्डुवाडी इंदापूर विमान दुर्घटनेनंतर माढा तालुक्यात विमानातून स्फोटचा भयंकर मोठा आवाज. काळ्या रंगाच्या...