इंदापूर येथे पत्रकार दिन सोहळ्यासाठी माजी
उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील.
विकासाचे भागीदार ठरणार पुरस्काराचे मानकरी
महिला सफाई कामगार भगिनींना पैठणी देऊन सन्मान
इंदापूर(प्रतिनिधी):महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका व शहर ग्रामीण मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने, ( दि. ६ जानेवारी )रोजी सकाळी १०. वाजता इंदापूर शहरातील डॉक्टर नीतू मांडके आय.एम.ए.हाऊस सभागृहात दूधगंगा शेजारी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते – पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते तसेच राज्याचे क्रीडा व अल्पसंख्यांक विकास मंत्री दत्तात्रय भरणे,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,माजी मंत्री महादेव जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार दिन सोहळा होणार आहेत.यामध्ये तालुक्यातील विकासाचे भागीदार यांना पुरस्कार प्रदान, तसेच महिला सफाई कामगारांना यांना पैठणी देऊन सन्मान व पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती, पत्रकार संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते व तालुका कार्याध्यक्ष जावेद मुलाणी तसेच मुख्य सचिव सागर शिंदे यांनी दिली.पत्रकार दिनानिमित्त इंदापूर तालुक्यातील विकासाचे भागीदार म्हणून, शहा ग्लोबल स्कूलच्या सौ.रुचिरा अंगद शहा,तसेच जय भवानी गड विकास प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीमंत ढोले यांना आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार तर,आदर्श पतसंस्था पुरस्कार श्री केतकेश्वर पतसंस्थेचे चेअरमन गोरख बळीराम आदलिंग,आदर्श युवा उद्योजक पुरस्कार जे.के.जगताप आणि कंपनीचे विराज जगताप,आदर्श प्रचार्य पुरस्कार शिवाजी विद्यालय जुनियर कॉलेजचे प्राचार्य दशरथ घोगरे,आदर्श योग शिक्षक पुरस्कार पतंजली योग समितीचे दत्तात्रेय अनपट,आदर्श वैद्यकीय सेवा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रेणीक शहा,तसेच आदर्श उद्योजक म्हणून कौशल्य फेब्रिकेशन उद्योग समूहाचे सर्वेसर्वा सागर भोसले यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.तर इंदापूर शहर व ग्रामीण भागातील महिला सफाई कामगार भगिनींना मोफत पैठणी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.तसेच तालुक्यातील पत्रकार बांधवांना आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे..यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे,सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने,इंदापूर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरतशेठ शहा,चंदूकाका सराफ चे चेअरमन किशोरकुमार शहा,इंदापूर बाजार समितीचे सभापती तुषार जाधव,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील,भाजपचे तालुकाध्यक्ष तेजस देवकाते,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष तेजसिंह पाटील,कार्याध्यक्ष महारुद्र पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे,कार्याध्यक्ष अतुल झगडे,व इंदापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष एडवोकेट गिरीश शहा,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते डॉक्टर शशिकांत तरंगे,तहसीलदार जीवन बनसोडे,गटविकास अधिकारी सचिन खुडे,यांच्यासह तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी व विविध राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर या पत्रकार दिन सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.
Home Uncategorized इंदापूर येथे पत्रकार दिन सोहळ्यासाठी उद्या(सोमवार) खासदार सुप्रियाताई सुळे उपस्थित राहणार. दिमाखदार...