इंदापूर येथे रेणुका हाॅलमध्ये इंदापूर फोटोग्राफर असोसिएशन व फोटोग्राफर महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने निकाॅन कॅमेरा माहिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेस प्रमुख पाहुणे उत्कृष्ट फोटोग्राफर व निकाॅन कंपनीचे मार्गदर्शक रंजन झिंगाडे व प्रमुख उपस्थिती निकाॅन कंपनीचे टेक्निकल मार्गदर्शक देव पाटील, महासंघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अभय कापरे, दौंड फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष सचिन गायकवाड,बारामती संघटनेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन हिरेमठ, टेंभुर्णी संघटनेचे अध्यक्ष सिध्देश्वर काळभोर होते.या कार्यक्रमात फोटोग्राफर श्री. नितीन खिलारे यांनी कोवीड काळात रुग्णवाहीकेच्या माध्यमातून उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल तसेच फोटोग्राफर श्री. दत्ता जाधव यांनी आतापर्यंत ७७ वेळी रक्तदान करून कोवीड काळात ८ वेळीस रक्तदान केल्याबद्दल असोसिएशन मार्फत सन्मानित करण्यात आले.या कार्यशाळेस इंदापूर, दौंड, बारामती, माळशिरस, करमाळा परीसरातील सर्व फोटोग्राफर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यशाळेचे प्रास्ताविक इंदापूर फोटोग्राफर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष महेश पाटील यांनी केले तर इंदापूर असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ ननवरे यांनी असोसिएशन मार्फत सुरू असलेल्या कामकाजाबाबत माहिती दिली. यावेळी फोटोग्राफर महासंघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अभय कापरे यांनी इंदापूर फोटोग्राफर असोसिएशनला महासंघ महाराष्ट्र मध्ये सामावून घेतले. कापरे यांनी फोटोग्राफीच्या समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी व फोटोग्राफरला कलाकार दर्जा व गॅझेटमध्ये नोंद करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. उत्कृष्ट फोटोग्राफर व निकाॅन कंपनीचे मार्गदर्शक रंजन झिंगाडे यांनी वेडींग फोटोग्राफर बाबत व कॅंन्डीड फोटो व सिनेमॅटिक व्हिडिओ बाबत माहिती दिली.
कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडन्यासाठी असोसिएशनचे पदाधिकारी व सर्व सदस्यांनी भाग घेतला. कार्यक्रमाचे आभार असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री.सचिन शिंदे यांनी केले.
Home Uncategorized इंदापूर येथे निकाॅन कॅमेरा माहिती कार्यशाळा संपन्न. इंदापूरसह दौंड, बारामती, माळशिरस, करमाळा...