इंदापूर: दुय्यम निबंधक (खरेदी विक्री) कार्यालयातील ऑपरेटर तथा मनमिळाऊ व्यक्तिमत्व सुनील संपत जगताप यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.आज सकाळी साडेदहा वाजता भूमि अभिलेख कार्यालयात ऑफिसच्या कामानिमित्त गेले असताना तेथे त्यांना चक्कर आली. ऑफिसचे सहकारी त्यांना त्वरित इंदापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले होते,तेथून अकलूज येथे त्यांना हलवण्यात आले.परंतु अकलूज मधील हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती मिळाली.इंदापूर तालुक्यातील गावा गावात त्यांचा दांडगा संपर्क होता. त्यामुळे त्यांच्या जाण्याची बातमी ही सर्वांसाठी धक्कादायक अशी होती.त्यांचा अंत्यविधी आज ५ वाजता खंडोबाच्या माळावरील लक्ष्मीआई मंदिरा शेजारील स्मशानभूमी येथे होणार आहे.
कोणतेही काम वेळेवर व अचूक पद्धतीने करणे ही त्यांची कला होती परंतु त्यांना कामाचा लोड होता असेही बोलले जात आहे. त्यांना दौंड,बारामती या कार्यालयात सुद्धा इंदापूरवरून जाऊन काम करावं लागत होते.