उपसंपादक -निलकंठ भोंग
दि. 23 जून रोजी राष्ट्रीय व राज्य विधी सेवा समिती तर्फे दिवाणी व फौजदारी न्यायालयामार्फत सरस्वती नगर, इंदापूर येथे कायदे विषयक मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या वेळी ॲड. बी.के.कडाळे यांनी बाल मजुरी कायदा व बालकांचे शिक्षणाचे अधिकार याविषयी मार्गदर्शन केले तर ॲड. मनीषा आदलिंग यांनी महिलांच्या विषयक कायदे व त्यांचे अधिकार या विषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व मुख्य व्यक्ते डी. डी.कांबळे सेवा निवृत्त सेशन न्यायाधीश यांनी अध्यात्मक व न्याय व्यवस्था यांची सांगड घातली. तसेच, आपल्या भागातील, कुटुंबातील वादविवाद सामोपचाराने मिटवले तर आपला वेळ व पैसा तर वाचतोच तसेच मानसिक ताण ही निर्माण होत नाही. तसेच समाधानी आयुष्य जगण्यासाठी वादविवाद न करणे व तात्काळ मिटवणे गरजेचे आहे.
याप्रसंगी मुख्य न्यायाधीश प्रकाश पाटील , सह दिवाणी न्यायाधीश स्वानंदी वाडगावकर , दुसरे सह दिवाणी न्यायाधीश .के.सि. कलाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
इंदापूर वकील संघटनेचे अध्यक्ष श्री एम.एस. चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले.
तसेच ॲड. आशुतोष भोसले यांनी सूत्रसंचालन केले तर ॲड रवींद्र शेळके यांनी आभार व्यक्त केला.कार्यक्रमात सर्व वकील बंधू व शेकडो नागरिक मोठया प्रमाणात उपस्थित होते.