इंदापूर शहरामध्ये व आसपासच्या परिसरात बेकायदेशीर गोहत्या करीत असल्याप्रकरणी इंदापुरातील पाच जणांवर एक वर्षाकरिता तडीपार आदेशाची अंमलबजावणी करत इंदापूर पोलिसांनी संबंधित पाच लोकांना उस्मानाबाद हद्दीत सोडत मोठी कारवाई केली आहे. याबाबत इंदापूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी सांगितले की,”इंदापूर पोलीस स्टेशन हद्दीतील १) रज्जाक इस्माईल बेपारी वय ५२ वर्षे रा. कुरेशीगल्ली इंदापूर २) अरफात रज्जाक कुरेशी २१ वर्षे रा. कुरेशीगल्ली इंदापूर ३) इमरान जब्बार बेपारी वय ३५ वर्षे रा. कुरेशीगल्ली इंदापुर ४)शाहिद शब्दर कुरेशी रा इंदापुर ५) अक्रम रशिद कुरेशी वय २१ वर्षे रा. कुरेशीगल्ली, इंदापुर यांनी संगणमत करून इंदापुर शहरात कुरेशीगल्ली या ठिकाणी तसेच आसपासचे परीसरात कोणताही शासकीय परवाना नसताना तसेच त्यांचेकडे कत्तल केलेले प्राणी व जिवंतप्राणी हे प्रजननक्षम नसलेबाबत व किंवा शेतीची मशागतीसाठी उपयोग नसल्याचे संबंधित प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र नसताना बेकायदेशीर जनावरांचे कत्तल करत असलेबाबत गुन्हे करताना मिळुन आल्याने त्यांचे विरोधात इंदापुर पोलीस स्टेशनला महाराष्ट्र प्राणी संरक्षण तसेच पशुक्रूरता अधिनियमा अन्वये एकुण ०४ गुन्हे दाखल असल्याने त्यांचे विरोधात मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ प्रमाणे कारवाई होणेकामी पोलीस अधिक्षक सो, पुणे ग्रामीण यांचे कार्यालयात प्रस्ताव पाठविण्यात आलेला होता. सदर प्रस्तावाचे अनुशंगाने वरील इसमांना मा. पोलीस अधिक्षक सो, पुणे ग्रामीण यांनी एक वर्षाकरीता संपूर्ण पुणे जिल्हयातुन ( पुणे शहर आयुक्तालय व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासह ) तसेच अहमदनगर जिल्हयातील कर्जत तालुका, सोलापुर जिल्हयातील माळशिरस व माढा तालुका यामध्ये हृदद पारीचा आदेश करणेत आलेले आहेत.पोलीस अधिक्षक सो, पुणे ग्रामीण यांचेकडील तडीपार आदेशाचे अनुशंगाने वरील प्रमाणे पाचही जणांना तात्काळ ताब्यात घेवुन त्यांना मा. पोलीस अधिक्षक सो, पुणे ग्रामीण यांचे आदेशाप्रमाणे इंदापुर पोलीस स्टेशन हद्दीतून जिल्हा उस्मानाबाद तालुका परांडा पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक १६/०८/२०२३ रोजी सोडण्यात आलेले आहे. तसेच इंदापुर शहरातील व ग्रामीण भागातील आणखी गुन्हेगार थोडयाच दिवसात तडीपार होणार असल्याचे माहिती पोलीस निरीक्षक दिलीप पवार साहेब यांनी दिलेली आहे.