प्रतिनिधी: निलेश भोंग
आगामी इंदापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वच सर्व जागांवर बहुजन मुक्ती पार्टी उमेदवार देणार असल्याचा मानस ॲड. राहुल मखरे यांनी जाहीर केले तसेच भाजपा बरोबर कुठल्याही परिस्थितीत युती करणार नसल्याचेही मखरे यांनी स्पष्ट केले.
तसेच इंदापूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन मुक्ती पार्टी चे पाच ते सहा नगरसेवक निवडून येणारच असा विश्वास पत्रकार परिषदेत व्यक्त केला.यावेळी ॲड. मखरे म्हणाले की,आम्ही इंदापूर शहरातील जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी आंदोलने केली. तसेच इंदापूर नगरपालिका हद्दीत होणाऱ्या प्रत्येक कामावरती लक्ष ठेवून निकृष्ट दर्जाच्या कामाचा पर्दाफाश करून चांगल्या दर्जाची कामे करून घेतली. त्यामुळे इंदापूर शहरातील नागरिकांचा आमच्यावर विश्वास असल्याने आम्ही इंदापूर नगरपालिकेच्या सर्व जागा लढविण्याचा विचार करू.
तसेच इंदापूर नगरपालिकेचा स्वच्छ कारभार, कमीशन मुक्त कामे, स्वच्छ इंदापूर, विकास कामांना प्राधान्य देण्याचे विषय व मुद्दे घेऊन आम्ही निवडणूकीत उतरू असेही ॲड. राहुल मखरे म्हणाले.तसेच आम्हाला दोन मते कमी पडली तरी चालतील पण आमची विचार धारा कधीही सोडणार नाही.माझ्याकडे सत्ता नाही परंतु माझ्याकडे सत्ता आल्यास मी सर्वांचे प्रश्न सोडवीन असे ही यावेळी ॲड.राहुल मखरे यांनी मत व्यक्त केले.यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे बाळासाहेब भोंग, संजय (डोनाल्ड) शिंदे, संतोष क्षिरसागर,सुरज धाईंजे, वसीम शेख, प्रकाश पवार सह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.