महाविकास आघाडीच्या काळात कोट्यावधी रुपयाचे विकास निधी आणून इंदापूरचा कायापालट करणारे माजी राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांनी आज विधानभवन पुणे येथे झालेल्या जिल्हा नियोजन समिती बैठकीमध्ये राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेऊन इंदापूर तालुक्यामधील तत्कालीन पालकमंत्री मा ना अजितदादा पवार साहेब यांनी 5 जून 2022 रोजी केलेल्या मंजूर कामांना जिल्हा नियोजन समितीमध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात यावी, अशी मागणी इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय मामा भरणे यांनी केली. राजकीय पक्षांमध्ये सर्वच ठिकाणी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांचे सलोख्याचे संबंध असल्याने यानंतरच्याही काळामध्ये विकास निधी कमी पडू देणार नाही, तालुक्याने दिलेल्या संधीचा मी फक्त विकासासाठीच उपयोग करेल व इंदापूर तालुक्याला सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन असे यावेळी दत्तात्रय भरणे यांनी बोलताना सांगितले.