इंदापूर तालुक्यात चोऱ्यांचे सत्र काही थांबायचे दिसेना. काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या केबल,मोटर, स्टार्टर चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते.आता ते कुठे नियंत्रणात येत नाही तोपर्यंतच गरीब मजूर व शेतकऱ्यांच्या शेळ्या मेंढ्या चोरण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे.
काल तरंगवाडी (तालुका इंदापूर) येथील मजुरी करून उपजीविका भागवणाऱ्या सचिन माने यांच्या घरासमोरील शेड मधून 5 पाठी, 2 शेळ्या,1 बोकड चोरीला गेल्याची घटना घडली आहे.सचिन माने हे गरीब कुटुंबातील कुटुंबप्रमुख असून मोलमजुरी करून आपली उपजीविका चालवतात. याच मोलमजुरीमधून मिळालेल्या पैशातून शेळ्या व पाठी विकत घेऊन ते सांभाळण्याचे काम करत होते. यातूनच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता. या शेळ्यांच्या संरक्षणासाठी घरासमोर त्यांनी पत्र्याचे शेड उभारून चारही बाजूला तारेची जाळी बांधून ठेवली होती. काल रात्री 11 वाजता त्यांनी सर्व शेळ्या व पाठींना चारा टाकल्यानंतर सकाळी उठून पाहतो तर 7 ( शेळ्या व पाठी) व 1 बोकड चोरीला गेल्याचे समजले. यानंतर मात्र खूप अपेक्षेने सचिन माने यांनी पोलिसांकडे धाव घेऊन आपली तक्रार नोंदवली. पोलिसांनी या घटनेची दखल घेऊन अज्ञात चोराच्या विरोधात भारतीय दंड संहिता 1860 कलम 379 नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.एकूणच इंदापूर तालुक्यात काही प्रमाणात कमी झालेले चोरीचे सत्र पुन्हा एकदा चालू झाल्याने शेळी पालन करणाऱ्या गरीब शेतकऱ्यांची चिंता वाढू लागलीी आहे.
Home Uncategorized इंदापूर तालुक्यात शेळी चोरांचा पुन्हा सुळसुळाट. गरीब कुटुंबाने सांभाळलेल्या 8 शेळ्या चोरीला....