इंदापूर तालुक्यात शिवसेना शिंदे गटात इनकमिंग सुरूच.. आज इंदापूर तालुका समन्वयक व क्षेत्रप्रमुख यांनी केला प्रवेश.

महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर अनेक ठिकाणी ठाकरे गटाच्या शिवसेनेचकडून शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचे प्रमाण वाढले आहे.(उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत) सुरुवातीला शहरी भागातून हे प्रवेश जादा प्रमाणात होते पण आता ग्रामीण भागातूनही मोठ्या प्रवेश होणे चालू झाले आहे त्याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे इंदापूर तालुक्यातील शिवसेना होय.
इंदापूर शहरात काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे पक्षातून शिंदे गटात मोठ्या प्रमाणात प्रवेश झाला होता.वेगवेगळ्या पदावर काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी थेट शिंदे गटात प्रवेश केला होता त्यातच आज दि.03 डिसेंबर 22 रोजी माजी जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाचे इंदापूर तालुका समन्वयक ज्ञानेश्वर चौगुलेइंदापूर तालुका क्षेत्रप्रमुख सुरज काळे यांनी सासवड येथे बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करुन ठाकरे गटाला एक प्रकारे धक्का दिला आहे. शिवसेनेमध्ये  वेगवेगळ्या पदावर प्रामाणिकपणे काम करत असतानाही सतत खच्चीकरण केले जात आहे त्याचप्रमाणे विश्वासात घेतले जात नाही म्हणूनच  चौगुले व काळे यांनी प्रवेश केला असल्याचे बाळासाहेबांची शिवसेना शहराध्यक्ष अशोक देवकर यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा प्रमुख सुरेंदर जेवरे,श्री.बबन खराडे, आण्णा काळे युवासेना,इंदापूर शहर प्रमुख अशोक देवकर,अवधूत पाटील,बालाजी पाटील आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here