इंदापूर: राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असली तरी इंदापूर तालुक्यात मात्र आतापर्यंत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीची दरी निर्माण झाल्याचे स्पष्ट चित्र दिसत होते.परंतु शिवसेनेचे इंदापूर तालुक्यातील नेते बबनराव खराडे यांनी निमगाव केतकी येथे हलगीच्या स्पर्धा भरवल्या आहेत आणि या कार्यक्रमाच्या उपस्थितांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मधील नेते व शिवसेनेतील नेते हे व्यासपीठावरील बॅनरमध्ये एकत्र फोटो टाकल्याने राष्ट्रवादी व शिवसेना प्रथमच एकत्र आल्याचे दाखवायचे आहे का? अशी चर्चा निमगाव केतकीमध्ये चालू होती.
इंदापूर तालुक्यात गेल्या विधानसभेपासून शिवसेनेने भाजपाशी केलेली युती ही महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतरही तशीच आहे का काय? असे चित्र इंदापूर तालुक्यामध्ये निर्माण झालेले होते. मध्यंतरी शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांमध्ये शिवसेनेला बोलावलं जात नाही, मुख्यमंत्र्यांचा फोटो टाकले जात नाहीत याबद्दल तीव्र स्वरूपात नाराजगी व्यक्त केलेली होती व त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी मधील दरी व मतभेद मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत होते.
निमगाव केतकी येथील शिवसेनेचे नेते बबनराव खराडे यांनी याबद्दल मध्यस्थी केल्याचे दिसून येते व निमगाव केतकीमध्ये हलगीच्या स्पर्धा भरवत शिवसेना व राष्ट्रवादीतील नेत्यांना एकत्र आणत “हम सब एक है” असे चित्र निर्माण करून दुरावा कमी करत महाविकास आघाडीचा धर्म पाळत असल्याचे दिसून येत आहे.
व्यासपीठवरील बॅनरमध्ये राज्यमंत्री दत्तामामा भरणे,आमदार यशवंत माने सरपंच प्रवीण डोंगरे, बजरंग राऊत, शिवसेनेचे माजी मंत्री विजय बापू शिवतारे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र काळे, जिल्हाध्यक्ष महेश पासलकर,संजय काळे यांचे फोटो होते तर स्वागतासाठी उभारलेल्या बॅनरवर ज्येष्ठ नेते भीमराव भोसले, विशाल दादा बोन्द्रे, नितीन कदम हा शिवसेनेचा स्वागतासाठी बॅनर होता.
यातूनच असे दिसून येते की इंदापूर तालुक्यातील शिवसेनेची नाराजीची दरी कमी होत चालली आहे व याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष फायदा हा महाविकास आघाडीचा तालुक्यातील इंदापूर तालुक्यातील समतोल राखण्यास होणार हे निश्चित आहे.