इंदापूर तालुक्यातील अवसरीमध्ये पुन्हा एकदा चोरांचा सुळसुळाट झाल्याचे दिसून येत आहे .काही दिवसांपूर्वीच अरुण साधू शिंगटे यांचे जवळपास तीन ते साडेतीन टन ,व वडापुरी नजीक पिंगळे वस्ती येथील भारत शिंदे यांचेही डाळिंब चोरीला गेले होते .या दोन्ही घटना ताज्या असतानाच मागील तीन दिवसांपूर्वी अवसरी मधील किसन बाळू मोरे यांचे दोन एकर मधील अंदाजे एक टनाच्या आसपास सिताफळ अज्ञात व्यक्तींनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. हे सिताफळ चोरीला जाण्याच्या आदल्या दिवशीच एका व्यापाऱ्याला 111 रुपये प्रती किलो प्रमाणे हा सीताफळाचा माल ठरवून दिला होता. आणि दुसऱ्या दिवशी हा माल व्यापारी तोडून घेऊन जाणार होता आणि त्याच रात्री या सिताफळावर चोरांनी डल्ला मारला. त्यामुळे अवसरी व अवसरी पंचक्रोशीत चोरांचा सुळसुळाट वाढताना दिसून येत आहे. शेतकरीही या चोरांमुळे हवालदिल झाले आहेत. या सततच्या होणाऱ्या चोऱ्यांमुळे पोलीस प्रशासन या चोरांवर कसा चाप लावेल हेच पाहण्याजोगे ठरेल.
Home Uncategorized इंदापूर तालुक्यात पुन्हा एकदा चोरांचा सुळसुळाट… तब्बल एक टन सिताफळावर मारला चोरांनी...