तुमच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्तानं एका कट्टर समर्थकाला सुचलेल्या काही ओळी..महाराष्ट्रातच नव्हे तर भारत देशात आपला तालुका कृषी क्षेत्रातील अग्रेसर तालुका म्हणून इंदापूर ची ओळख होती. ती केवळ मा.ना.श्री.हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या मुळेच होय.त्यांनी या इंदापूर तालुक्याला भरभरून दिल.परंतू त्यांचा विश्वासघात झाला.,साहेबांचा पराभव .कार्यकर्त्यांनी केलेला हलगर्जीपणा, अंतर्गत कलह,काही महत्वाकांक्षी नेते यांच्या मुळेच यांना पराभवाचा सामना करावा लागला. पराभवानंतर खरे कार्यकर्ते, जवळचे,निस्वार्थी प्रेम करणारे, निष्ठावंत कोण आणि सत्तेसोबत असलेले व आपल्या पासून दूरावलेले,पळून गेलेले कोण आहेत हे कळण्यासाठिच नियतीने हि विस वर्षाच्या राजकीय तपच्श्रर्येनंतर घेतलेली परीक्षा होती असे म्हटले तर वागवे ठरणार नाही. पण आपण या सर्व प्रतिकुल परिस्थितीत सर्वांना हसत हसत पुरून उरलात हेच तुमच्या चाणाक्ष व्यक्तिमत्त्वाचं व राजकिय यशाच गुपित मात्र जनतेसमोर खुलं झाल अस म्हणावे लागेल.
पाटील साहेबांनी ज्याला बोटाला धरून राजकारण आणले व नावलौकिक मिळवून दिला, अशांनीच पाटील साहेब यांच्या विरोधात षडयंत्र रचले.बेसावध पाटील साहेब यांना कार्यकर्त्यांनावर प्रचंड विश्वास होता.वेळ निघून गेली….. अनेकांना पश्चात्ताप होतोय……”
मात्र पाटील साहेबांनी पराभव मान्य करित पुन्हा जोमाने कामाला सुरुवात केली आहे. एखादा अपवाद वगळता मा.साहेब यांचा विजय ” आहेच.हे आजपर्यंत चे उदाहरण आहे.मा.ना.श्री.हर्षवर्धनजी पाटील साहेब यांनी ज्याला हात लावला,त्याचे सोने झाले.*पाटील साहेब मात्र स्वत:च्या नेतृत्वावर व कर्तृत्वावर मोठे झाले. कोणतेही राजकीय पाठबळ नसताना आपण भाऊंचे व बापूंचे आशिर्वादाने हिमालया एवढी उंची गाठली. विशेष म्हणजे राजकीय प्रवास करित असताना आपण स्वतःसाठी काहिच केल नाही. कोणतेहि संस्था /बॅक/सहकार/उद्योग (स्वतःसाठी ) उभा केला नाही.राजकारण्यांनी धंदा करायचा नसतो हे कर्मयोगी आदरणीय मोठे भाऊं यांच्या पासून ते पर्यंतच व्रत आपण जपल.आपल्या कार्याचा “ठसा” संवैधानिक व संसदीय मार्गाने संपूर्ण जनतेला पूर्णवेळ झोकून सर्व काही मिळवून देण्याच काम आपण आयुष्यभर केल.फक्त जनतेच्या कल्याणासाठी आपण झगडत राहिलात व अनेकांना मोठ केल.
साहेब … हे करीत असताना आपल मीठ आळणी निघाल! “ज्यांनी आपल्याला काही
मागितल,त्याना ते आपण दिलत.”कधी कुणाला नाराज केल नाही. ज्याची सायकल चालवायची लायकी नव्हती,त्याला आपण विमानाने फिरवल.ज्या शहराला सगळ्यात मोठ खेङ समजल जायचे ते इंदापुर. त्या शहरासाठी तर आपण जीवाचे रान करून इंदापूर तालुक्याच्या विकास कामाने चेहरामोहरा बदलून टाकला.कधीच गटा-तटाचे राजकारण केले नाही, यामुळे च आपण इंदापूरकरांचे पालक झालात.परंतू काही विघ्न संतोषी लोकांना आपल्या पालकत्वाचा विसर पङला आपल्या विश्वासाला तडा जाणार नाही याची आपल्याला खात्री होती नेमक उलट झाले.
जे काही घङल ते योग्यच घङल म्हणाव लागेल.उशिरा का होईना निष्ठावंताची जाण झाली.संधीसाधू संपले.एकदंर संपूर्ण इंदापूर तालुक्याला आपल्या शिवाय पर्याय नाही हेही लक्षात आले आहे . साहेब येणारा काळ आपलाच आहे. ……… गरज आहे ती वेळेची……..!!!!
– मा.ना.श्री.हर्षवर्धनजी पाटील साहेब कट्टर समर्थक मा.श्री.अतुल दत्तात्रय सूळ,उपसरपंच सुरवड