इंदापूर तालुक्यातील १७ रस्त्यांच्या कामासाठी शासनाच्या विशेष रस्ते दुरुस्ती व अर्थसंकल्पीय तरतुदीतून तब्बल १४४ कोटी ४ लाखांचा निधी मंजूर

इंदापूरला रस्ते व इमारतींच्या बांधकामाकरिता १४४ कोटींचा निधी….आमदार दत्तात्रय भरणे यांची माहिती
इंदापूर:इंदापूर तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या १७ रस्त्यांच्या कामासाठी शासनाच्या विशेष रस्ते दुरुस्ती व अर्थसंकल्पीय तरतुदीतून तब्बल १४४ कोटी ४ लाखांचा निधी मंजूर केल्याची माहिती माजीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली असून यापैकी काही कामे तातडीने सुरू करण्यात आली आहेत.तर काही कामे निविदा स्तरावर असल्याचे सांगण्यात आले आहे.
इंदापूर तालुक्यातील जवळपास प्रमुख जिल्हा मार्गांची कामे गेल्या काही वर्षांपूर्वीच पूर्ण झाली आहेत.दरम्यान या रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहतूक होत असते.प्रामुख्याने उसाची मोठी वाहतूक होत असल्याने या रस्त्यांना प्राधान्याने निधी देण्यात आला आहे. रस्त्यांच्या कामासाठी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातून रस्ते व पुल परीक्षण व दुरुस्ती कार्यक्रम २०२१ – २२ व २०२२ – २३ या दोन आर्थिक वर्षात मिळून जवळपास ९८ कोटींचा निधी मंजूर करून आणला आहे.या योजनेतून तालुक्यातील रा.मा. १३२ ते बोरी येसुपारवाडी शेळगांव रस्ता (४ कोटी ८० लाख),इतर जिल्हा मार्ग १९६ ते बंबाडवाडी चव्हाणवाडी ग्रामीण मार्ग २४ ते प्रमुख जिल्हा मार्ग १७० ची दुरुस्ती करणे(२० कोटी २५ लाख),राष्ट्रीय महामार्ग ९ येथील भादलवाडी पिलेवाडी विठठलवाडी काळा ओढा मानेवस्ती पर्यंत रस्ता दुरुस्त करणे (१४ कोटी ७५ लाख),धवलपुरी (हनुमान मंदीर) ते रा.मा. १२० प्रजिमा-भोकरवाडी पालवे वस्ती ते रा.मा. १२४ लक्ष्मीनगर कळंब रस्ता दुरुस्त करणे (१३ कोटी), रा.म.६५ पळसदेव न्हावी थोरातवाडी व्याहळी रस्ता दुरुस्त करणे (२ कोटी २५ लाख), राष्ट्रीय महामार्ग १६५ जी ते गोतोंडी घोरपडवाडी दगडवाडी निरवांगी रस्ता दुरुस्त करणे (१८ कोटी ५० लाख), रा.म.क्र. तोंडेवाडी माळेवाडी शेलारपट्टा भावडी चितळ करवस्ती वरकुटे बु रस्ता दुरुस्त करणे (१२.५० कोटी) ,रेडा लाखेवाडी-फडतरे वस्ती-बोराटवाडी-खोरोची रस्ता दुरुस्त करणे (१२ कोटी)तसेच शेटफळगढे ते शेटफळगढे बारामती तालुका हद्द रस्ता (४कोटी) हगारेवाडी ते दगडवाडी रस्ता (३कोटी) राजेगाव भिगवन स्टेशन ते भिगवण बायपास रस्ता (७ कोटी) कळंब ते भोरकरवाडी रस्ता (२.५० कोटी) रेडा ते लाखेवाडी रस्ता (१० कोटी) कौठळी ते वरकुटे रस्ता (४ कोटी) सराफवाडी ते रेडा रस्ता (४कोटी) आदी कामे होणार आहेत.याशिवाय अर्थसंकल्पातून मंजूर झालेल्या निधीतून इंदापूर येथे शासकीय विश्रामगृह इमारत (३.५४ कोटी)शासकीय अधिकारी निवासस्थान इमारत (३.२८ कोटी) भिगवन शासकीय विश्रामगृह इमारत (३.१० कोटी) भिगवन सार्वजनिक बांधकाम कार्यालय इमारत (१.५७ कोटी) इमारत बांधकाम आदी कामे होणार आहेत.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here