इंदापूर: अनंतराव देसाई एज्युकेशन फाउंडेशन तर्फे इंदापूरमध्ये शनिवार दि.29 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता गुरुकृपा मंगल कार्यालय येथे पुणे विद्यापीठचे माजी कुलगुरू व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य डॉ अरुण अडसूळ सर यांचे आजचा युवक व स्पर्धा परीक्षा यावर व्याख्यान आयोजित केले आहे अशी माहिती अनंतराव देसाई एज्युकेशन फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष माधवी देसाई यांनी माहिती दिली.
अनंतराव देसाई एज्युकेशन फाउंडेशन तर्फे शनिवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी इंदापूर या ठिकाणी आजचा युवक व स्पर्धा परीक्षा यावर पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी सदस्य डॉ अरुण अडसूळ सर यांचे व्याख्यान आयोजित केले असल्याचे माहिती अनंतराव देसाई एज्युकेशन फाउंडेशन च्या संस्थापिका अध्यक्ष माधवी देसाई यांनी माहिती दिली. अनंतराव देसाई एज्युकेशनल फाउंडेशन संचलित अनंत अभ्यासिका ही इंदापूर शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी असलेली ही अभ्यासिका असून गेल्या एक वर्षापूर्वी स्थापन झालेल्या या अभ्यासिकेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्रामीण भागातील युवकांनी स्पर्धा परीक्षा देताना कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे यासाठी महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध असलेले माजी कुलगुरू डॉ अरुण अडसूळ यांचे व्याख्यान या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित केले आहे. सदरचे व्याख्यान हे गुरुकृपा मंगल कार्यालय इंदापूर येथे होणार आहे.सदरचा कार्यक्रम हा युवकांसाठी खूप महत्त्वाचा असून ग्रामीण भागातील युवकांना स्पर्धा परीक्षा विषयी संपूर्ण माहिती मिळणार आहे या कार्यक्रमासाठी तहसीलदार जीवन बनसोडे, पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, हाय कॉलेजचे प्राचार्य डॉ जीवन सरोदे, विद्या प्रतिष्ठानचे प्राचार्य डॉ सुजय देशपांडे, प्राध्यापक भरत भुजबळ ,प्राध्यापिका जयश्री गटकुळ, गुरुकुलचे संस्थापक लक्ष्मण हरणावळ इत्यादी विशेष उपस्थिती म्हणून लाभणार आहेत.तरी इंदापूर तालुक्यातील व परिसरातील तमाम विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेऊन स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन अनंतराव देसाई एज्युकेशनल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष माधवी देसाई यांनी केले आहे.
Home Uncategorized इंदापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी खुशखबर..! “आजचा युवक व स्पर्धा परीक्षा” या विषयास अनुसरून...