बारामती लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात घडामोडी पाहायला आता मिळत आहेत. गेल्या अनेक दिवसापासून काटे की टक्कर म्हणून पाहिल्या जाणाऱ्या इंदापूर विधानसभा मतदारसंघ हा सुद्धा एक चर्चेचा मतदार संघ म्हणून ओळखला जातो आणि याच मतदारसंघात हर्षवर्धन पाटील आणि आमदार दत्तात्रय भरणे यांच्यात चुरस सुद्धा निवडणुकीपासून ते पुढार्यांच्या पक्षप्रवेशापर्यंत पाहायला मिळाली.
आज खास सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीचा एक बडा नेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागला याची खात्रीपूर्वक माहिती मिळाली आहे. या दिग्गज नेत्याचे उजनी बॅक वॉटर भागात फार मोठ्या प्रमाणात वजन असून राष्ट्रवादीच्या निर्मितीपासून हा नेता राष्ट्रवादीसोबतच होता व मोठ-मोठी पदेही त्यांनी भूषवलेली आहेत.
दोन दिवसांपूर्वी या नेत्याने माजी मंत्री विजय बापू शिवतारे यांचीही भेट घेऊन आपली भूमिका मांडली आहे. आणि त्यानंतरच त्याच ठिकाणी ह्या बाकीच्या गोष्टीची खलबते झालेची चर्चा आहे. या बड्या नेत्यासोबत आणखी काही नेते जाणार आहेत.मिळालेल्या माहितीनुसार स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लवकरच त्यांच्या गावात येऊन एक मोठा समारंभ घेणार आहेत.एकंदरीतच या बड्या नेत्याच्या शिंदे गटात होणाऱ्या पक्षप्रवेशामुळे इंदापूर तालुक्यातील शिंदे गटाला एक मोठा नेता मिळणार आहे एवढं निश्चित. बारामती लोकसभा निवडणुक तर्कवितर्क पहा पुढील लिंक वर क्लिक करूनhttps://youtu.be/RE5UnWvukNQ