इंदापुर: शेतात लागवड केल्यानंतर फळ विक्रीला जाण्यापर्यंत तळहाताच्या फोडा प्रमाणे शेतकरी त्याची बाग सांभाळत असतो. आणि त्याला ते फळ विकून पैसे मिळण्याची वेळ येते त्याच्या एक-दोन दिवस आधीच त्याच्या पिकावर चोर डल्ला मारून जातात अशा अनेक घटना आपण पाहिल्या आहेत,अशीच एक घटना घडली आहे इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली या गावांमध्ये या गावातील युवा शेतकरी राजेंद्र उर्फ पंकज शिंदे व स्वप्नील शिंदे या शेतकऱ्यांनी त्याच्या शेतात तीन एकर कलिंगड लागवड केली होती. या लागवडीसाठी त्यांनी खर्चही भरपूर केला होता. या शेतकऱ्यांनी केलेल्या मेहनतीला चांगले यश मिळाले होते व तब्बल 40 टन पेक्षा जास्त माल त्याच्या शेतात होता.व अंदाजे चार लाखापेक्षा जादा त्यांना उत्पन्न मिळेल असा त्याचा प्राथमिक अंदाज होता.
गेल्या आठवड्यात सकाळी 10 वाजता शेतकरी शेतात गेल्यानंतर कलिंगडाची चोरी झाली आहे असे त्याच्या लक्षात आले. त्याच्या शेतातील तोडणी योग्य झालेला दीड एकरातील साधारण 20 टन पेक्षा जास्त माल चोरीला गेला असे निदर्शनास आले. यामध्ये कलिंगडाच्या वेली अस्ता-व्यस्त पडलेल्या होत्या हे सर्व पाहताच या युवा शेतकऱ्याच्या मनात दुःखाचा डोंगर कोसळला त्याने त्वरित बावडा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन माहिती दिली. पोलिसांनी ही प्रत्यक्ष येऊन या सर्व गोष्टीची पहाणी केली व गुन्हा नोंद केला.आता या सर्व प्रकाराचा पोलीस तपास करत आहेत.👉 स्थानिकांच्या मदतीने व्यापाऱ्यांनीच केला असावा हा कारनामा- शेतकऱ्यांचा संशय.
कलिंगड चोरी होण्याच्या चार दिवस आधी महुद येथील व्यापारी व करमाळा येथील व्यापारी या शेतकऱ्याच्या शेतात येऊन कलिंगडाची पाहणी केली होती. स्थानिकांच्या मदतीने व्यापाऱ्यांच्यावर संशय आहे असे मत या शेतकऱ्यांचे आहे,म्हणून आता पोलिस या व्यापाऱ्यांची सखोल चौकशी करणार का? हा सुद्धा विषय समोर येतो.सध्या इंदापूर तालुक्याला एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून टी वाय मुजावर साहेब लाभलेले असल्याने या शेतकऱ्यांला चोर नक्की सापडेल अशी अपेक्षा आहे
याआधी डाळिंबाची ही चोरी झाली होती
या कलिंगड शेताच्या काही अंतरावरच पाच महिन्यापूर्वी हरिभाऊ पुंडे या शेतकऱ्याच्या शेतातील डाळिंबाची ही चोरी झाली होती.या शेतकऱ्यानेही तक्रार देऊन त्यातून काहीच निष्पन्न झाले नव्हते. त्यामुळे आता झालेल्या कलिंगड चोरीबाबत पोलिसांनी योग्य तपास करावा असे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.