इंदापूर तालुक्यातील भांडगाव येथील महिलांनी ग्रामसभेला उपस्थित राहून दारूबंदीवर ग्रामसभेत ग्रामपंचायत कडून ठराव मंजूर करून घेतला आहे. ग्रामपंचायत मधील सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ यांनी तातडीने एक मताने ठराव मंजूर केला आहे .त्या ठरावात असे म्हटले आहे की ,भांडगाव हद्दीत काही लोक अनाधिकृतपणे दारू विक्री करत आहेत. त्यामुळे गावात दारू पिऊन समाजकंटक गोंधळ घालत आहेत ,त्यामुळे गावातील महिलांना त्याचा खूप त्रास होत आहे. अनाधिकृतपणे दारू विक्री करणाऱ्यांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी असा दि. १४ ऑगस्टच्या ग्रामसभेमध्ये अशा आशयाचा ठराव संमत करून पोलीस स्टेशनलाही देण्यात आलेला आहे.
गावातील काही महिला तर आमचा प्रपंच वाचवा , या दारुमुळे आमच्या प्रपंचाची वाट लागली आहे .वाटोळे होऊ लागले आहे .त्यावर बंदी तात्काळ आणा, गावात दारू विकलीच नाही पाहिजे असे काहीतरी करा अशा विनंत्या ग्रामसभेमध्ये काही महिलांनी केल्यावर तात्काळ यावर एक मताने ठराव करून पोलीस स्टेशनला देण्यात आला. बावडा पोलीस स्टेशन ने सुध्दा या महिलांच्या विनंतीचा मान राखत दारूबंदी साठी पोलीस स्टेशन सर्वतोपरी मदत करेल आणि दारू विकणाऱ्या विक्रेत्यांची पोलीस स्टेशनला माहिती पुरवावी असेही आवाहन करण्यात आले आहे.आता इंदापूर तालुक्यातून भांडगावने दारूबंदीची सुरुवात केल्यानंतर तालुक्यातील इतरही गावात याचे अनुकरण होणार का? आणि भांडगावात जरी ठराव मंजूर केला असला तरी तेथील दारूबंदी होणार का ? या सर्व गोष्टी महत्त्वाच्या ठरणार आहेत.
Home Uncategorized इंदापूर तालुक्यातील ” या ” गावातील महिलांनी ग्रामपंचायतमध्ये जाऊन घेतला “दारूबंदी ठराव”...